Health Tips : मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी होईल कमी; ट्राय करा हे घरगुती उपाय
Health Tips : मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी जर कमी करायची असेल तर तुम्ही या घरगुती टिप्स फॉलो करू शकता.
Health Tips : मासिक पाळी दरम्यान किंवा मासिक पाळी येण्याआधी पोट दुखीची समस्या अनेकांना जाणावते. याला पीरियाड्स क्रँप्स देखील म्हटलं जातं. मासिक पाळीचा दरम्यान होणाऱ्या पोटदुखीमुळे अनेक वेळा थकवा जाणतो. काहींना डोके दुखी, पाठ दुखी आणि कंबर दुखीची समस्या देखील जाणावते. मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी जर कमी करायची असेल तर तुम्ही या घरगुती टिप्स फॉलो करू शकता.
पोटाच्या खालच्या भागात दुखत असेल तर प्रथम गरम पाण्याच्या पिशवीनं पोट शेका. जर गरम पाण्याची पिशवी नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टॉव्हेल भिजवून तो टॉव्हेल पोटावर ठेवून पोट शेकू शकता.
असेंशियल तेल
पोटाच्या खालच्या बाजूला असेंशियल तेलानं मसाज केल्यानं पीरियाड्स क्रँप्स कमी होतात. एनिसे ऑइल, निलगिरीचे तेल, पेपरमिंट तेल, लवंगापासून तयार केलेले तेल, गुलाब तेल किंवा लॅव्हेंडर तेल इत्यादी तेलांचा वापर तुम्ही करू शकता. हे तेल तुम्हाला कॉस्मेटिक्स स्टोअरमध्ये मिळू शकते.
हर्बल टी
हर्बल टी प्यायलानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान होणारी पोट दुखी कमी होते.
या गोष्टी टाळा
लिंबू, केळी, दही,दूध आणि मुळा या गोष्टींचे मासिक पाळी दरम्यान अतिसेवन करणे टाळा. तसेच थंड आणि आंबट गोष्टी खाणं देखील टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Bitter Guard Benefits : कडू कारलं आरोग्यासाठी अनेक प्रकारे गुणकारी! जाणून घ्या कारलं खाण्याचे फायदे..
- Health Tips : हळदीचे दूधच नाही तर, हळदमिश्रित पाणीही शरीरासाठी लाभदायी! जाणून घ्या फायदे...
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )