एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याची पक्रिया तातडीने सुरु करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत.

Devendra Fadnavis : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी 19 दिवसांपासून सापडेलेले नाहीत. त्यामुळे बीड पोलिसांकडून तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मोठे आदेश दिले आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याची पक्रिया तातडीने सुरु करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत. त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. 

तर परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करा

दरम्यान, बीड जिल्ह्यामध्ये गन कल्चरवर गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटबाॅम्ब टाकताना अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले आहेत. यावरून बीडमध्ये मिशाही न फुटलेल्या पोरांसोरांच्या हाती बंदूक दिसून येत आहेत. खंडणीखोर फरार वाल्मिक कराडच्या मुलाचाही त्यांनी फोटो पोस्ट केला असून त्याच्याही कमरेला बंदूक दिसून येत आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. बीड पोलिस अधीक्षकांना तातडीने फेरआढावा घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

दुसरीकडे, बीडमध्ये विरोधकांकडून बीडचा बिहार झाला आहे असा आरोप होत असून त्यामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचे दिसून येत आहे. बीडमधील गन कल्चरवरून बीडमध्ये नेमके परवाने आहेत तरी किती असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान बीडमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. 

बीड जिल्ह्यात किती जणांकडे शस्त्र परवाना? 

अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार बीड, परभणी, अमरावती या ठिकाणी सर्वात जास्त परवाने दिल्याचे म्हटलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1 हजार 281 जणांकडे शस्त्र परवाना आहे. दरम्यान, परवाना देताना सर्व प्रकारची शहानिशा करूनच परवाना दिला जातो. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाते. मात्र बीड जिल्ह्यामध्ये टपरी पोरं सुद्धा ज्या पद्धतीने बंदूक कमरेला लावून फिरत आहेत त्यावरून पोलिसांनी खेळण्यातील बंदूक दिल्याप्रमाणे परवाने दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीडमध्ये तीन दिवसांपूर्वी कैलास फडला अटक केली आहे. त्याचाही हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Embed widget