Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
मी माफी-बिफी काही मागणार नाही. कृपया हा विषय संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन कुठूनही दुसरीकडे हिरो-हिरोईनकडे नेऊ नये, असे म्हणत मीडियालाही आमदार सुरेश धस यांनी विनंती केली

मुंबई : राज्यात सध्या बीड प्रकरणावरुन गदारोळ माजला असताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर तोफ डागली आहे. बीडमधील आजच्या मोर्चातूनही त्यांनी मुंडे बंधु-भगिनींवर हल्लाबोल केला. तत्पूर्वी त्यांनी काल परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा संदर्भ देत अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali), रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच, आमदार धस यांचे वक्तव्य जाणीवपूर्वक चारित्रहनन करण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या वक्तव्यातील कुत्सितपणा दिसून येतो. त्यामुळे, त्यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने कली होती. मात्र, आपण माफी-बिफी मागत नसतो, असे म्हणत धस यांनी माळी यांची मागणी फेटाळून लावली. तसेच, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा विषय डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही धस यांनी म्हटले.
माझं मत असंय की, मी माफी-बिफी काही मागणार नाही. कृपया हा विषय संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन कुठूनही दुसरीकडे हिरो-हिरोईनकडे नेऊ नये, असे म्हणत मीडियालाही आमदार सुरेश धस यांनी विनंती केली. त्यांना राजकारणात खेचण्याचा काही संबंध नाही, त्या काय माझ्या दुश्मन नाहीत. माझी अन् त्यांची नीटनेटकी ओळखही नाही. मी फक्त त्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा का काय तो कार्यक्रम पाहात असतो. तेवढ्या पुरतंच त्या माहिती, जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्यजत्रा बघायचं बंद करतो, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी प्राजक्त माळीच्या पत्रकार परिषदेनंतर दिली आहे.
विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न
हा विषय कोण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कोण करतय. मला वाटतंय त्यांचे बीड जिल्ह्यातील कोणत्यातरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत, त्यातूनच हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात असावा. माझी हात जोडून, पाया पडून विनंती आहे, तुम्ही आत्ता जे स्टेटमेंट केलं ते थांबवा, असे म्हणत प्राजक्त माळी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या मागणीवरुन आमदार धस यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन विषय डायव्हर्ट करण्याचा हा विषय असल्याचीही शंका धस यांनी व्यक्त केली आहे.
प्राजक्ता माळींची महिला आयोगाकडे तक्रार
प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच, आमदार धस यांच्याबद्दल महिला आयोगाकडे तक्रार केली असून मुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली आहे. आता, धस यांच्या केलेल्या टिकेनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी घेणार पत्रकार परिषद घेऊन सर्वकाही स्पष्ट केलं. त्यानंतर, त्या मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत. धस यांनी केलेले आरोप याची वस्तूस्थिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचही माळी यांनी म्हटलं. दरम्यान, माळी यांनी महिला आयोगात तक्रार दाखल केलेली आहे. धस यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईबाबत पाऊल उचलणार
हेही वाचा
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं

























