एक्स्प्लोर

Suraj Chavan : सूरजच्या झापुक झुपूक सिनेमाचा मुहूर्त, 'या' कलाकारांचीही लागली सिनेमात वर्णी

Suraj Chavan : केदार शिंदे दिग्दर्शित सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे.

Suraj Chavan :  बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) विजेता झालेला सूरज चव्हाण (Suraj Chavan) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यातच केदार शिंदे यांनी सूरजवर सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं. 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) असं या सिनेमाचं नावही त्यांनी सांगितलं होतं. नुकतच या सिनेमाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सूरज चव्हाणसोबत या सिनेमात मालिकेतील अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे.  कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमधील काही कलाकार या सिनेमात झळकणार आहे. 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मलिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, 'अबीर गुलाल' मालिकेतील पायल जाधव, 'तुमची मुलगी काय करते' मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे हे कलाकार या मालिकेत झळकणार आहेत. 

सूरजच्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता

सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला असला तरीही सिनेमाच्या तारखेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच सिनेमाची कथा काय असणार याविषयी देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर सूरजच्या आयुष्यातील हा एक मोठा टप्पा आहे. त्यासाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

सूरज चव्हाण कोण आहे?

मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला. 

बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.   

View this post on Instagram
 
A post shared by Deepa Pansarre (@deepalipansareofficial)

ही बातमी वाचा : 

Sandhya Theatre Stampede: चार तास पोलीस स्थानकात, तो व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुन भावुक; चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP MajhaBuldhana Lonar Lake Update : लोणार सरोवराचं नुकसान होत असल्याच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, भूस्खलन होत असलेल्या भागाची पाहणी होणारNDA Meeting Update : एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी, अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहितीABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
Embed widget