Entertainment News Live Updates 7 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केली वेडिंग स्टोरीची झलक
Sonali Kulkarni : कोरोनाकाळात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) लग्नबंधनात अडकले. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर सोनालीने पुन्हा एकदा कुणालसोबत थाटामाटात लग्न केलं. आता सोनालीने चाहत्यांसोबत तिच्या दुसऱ्या वेडिंग स्टोरीची झलक शेअर केली आहे.
View this post on Instagram
Shehnaaz Gill : शहनाज गिलनं शेअर केला खास व्हिडीओ
View this post on Instagram
Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती 14'चा आज होणार ग्रॅंड प्रीमियर
Kaun Banega Crorepati 14 Premiere 7 August 2022 : 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) हा छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम आहे. यंदादेखील या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सांभाळणार आहेत. आज या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. सोनी टीव्हीवर या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
View this post on Instagram
Dagdi Chawl 2 : डेझी शहाची मराठी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; 'दगडी चाळ 2' मधील ' राघू पिंजऱ्यात आला' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस
Dagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Dagdi Chawl 2) हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.
ओळखा पाहू 'ही' कोण?
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटोत दिसणारी ही चिमुकली ‘टिप-टिप बरसा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. ज्यांनी हे गाणे ऐकले असेल त्यांना या अभिनेत्रीचे नाव चुटकीसरशी ओळखत येईल!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
