एक्स्प्लोर

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत

'दगडी चाळ 2' येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार?  हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्यबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. 'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे तर अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने 'डॅडीं'ची साथ सोडली की, अजूनही सूर्या 'डॅडीं'चा उजवा हात आहे? हे 'दगडी चाळ 2' पाहिल्यावरच कळेल. 

पाहा पोस्टर: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती, चित्रपटातील इतर कलाकारांविषयी. ज्याचा उलगडा लवकरच होईल.

वाचा सविस्तर बातमी 

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2'मध्ये पाहायला मिळणार डॅडी आणि सूर्यामधील संघर्ष, नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
Sanjay Raut: भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, शायना एनसी प्रकरणात संजय राऊतांचा पलटवार
भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, संजय राऊतांचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule on Sharad Pawar Padwa : पवारांच्या घरात दोन पाडवा; सुप्रियाताईंची संतप्त प्रतिक्रियाBaramati Diwali Padwa : गोविंद बाग, काटेवाडी शरद पवार-अजित पवारांचा पाडवा वेगवेगळाABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 02 November 2024Ravi Rana Navneet Rana Padwa: रवी राणा, नवनीत राणांचं औक्षण, आमदारकीचं मागितलं गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र आणि तेथील जनता आपल्या सोबत आहे की नाही अशी शंका; महाराष्ट्र एकीकरण समितीची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
उद्धव ठाकरे आणि सीएम एकनाथ शिंदे कोल्हापुरात एकाच दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ!
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश
Sanjay Raut: भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, शायना एनसी प्रकरणात संजय राऊतांचा पलटवार
भाजपवाले सोनिया गांधींनाही इम्पोर्टेड माल, विधवा बोलायचे, संजय राऊतांचा पलटवार
Ajit Pawar Gold Mithai : लाडक्या दादांसाठी सोन्याची मिठाई,  कार्यकर्त्याकडून पाडवा भेट
Ajit Pawar Gold Mithai : लाडक्या दादांसाठी सोन्याची मिठाई, कार्यकर्त्याकडून पाडवा भेट
PM Modi Vs Kharge: पंतप्रधान मोदींनी 'त्या' वक्तव्यावर बोट ठेवत काँग्रेसवर टीकेची राळ उठवली, मल्लिकार्जुन खरगेंचाही पलटवार
पंतप्रधान मोदी आणि खरगेंमध्ये जोरदार ट्विटर वॉर, एकमेकांवर तुटून पडत जुना हिशेब काढला
53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे दागिने जप्त, विधानसभेच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये घबाड सापडलं
53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे दागिने जप्त, विधानसभेच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये घबाड सापडलं
Maharashtra Assembly Election 2024 : अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांचा वेळ; अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांचा वेळ; अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण?
Embed widget