Salman Khan : सलमान खानच्या फोटोवर चाहते फिदा; म्हणाले,"बॉलिवूडची शान भाईजान"
Salman Khan : सलमान खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Salman Khan Photo : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या धमकीप्रकरणामुळे चर्चेत आहे. अशातच दबंग खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. सिनेमांसह त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे याची चाहत्यांना उत्सुकता असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांना संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.
धमकीप्रकरणामुळे सध्या चर्चेत असलेल्या सलमानने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भाईजान खूपच आनंदी दिसत आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट, हातात ब्रेसलेट असा काहीसा सलमानचा लुक आहे. हा फोटोत शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"हाय".
View this post on Instagram
सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहूण चाहते भाईजानवर फिदा झाले आहेत. त्याच्या फोटोवर,तुझ्या लग्नाची आम्ही वाट बघतोय..कधी होणार", 'बॉलिवूडची शान भाईजान', 'आज तू खूपच हॉट दिसत आहेस', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
धमकीप्रकरणामुळे सलमान खान चर्चेत
सलमान खानला काही दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी धाकड राम बिश्नोई या आरोपीला अटक केली. पण नंतर यूकेमध्ये लपून बसलेल्या गोल्डी ब्रारने तो ई-मेल पाठवला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. धमकीप्रकरणानंतर सलमान खान 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन कार्यक्रमात पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आला.
सलमान खानसाठी 2023 वर्ष खूपच खास
सलमान खान 'अंतिम : द फायनल ट्रुथ' या सिनेमात शेवटचा दिसला होता. 2022 मध्ये सलमानचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे त्याचे चाहते आता त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण 2023 हे वर्ष भाईजानसाठी खूपच खास आहे. या वर्षात त्याचे 'किसी का भाई किसी की जान' (Kisi ka Bhai Kisi Ki Jann) आणि 'टायगर 3' (Tiger 3) हे दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा येत्या 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 'टायगर 3' हा सिनेमा 10 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Salman Khan: गोल्डी ब्रारनेच ई-मेलद्वारे सलमानला दिलेली जीवे मारण्याची धमकी? पोलिसांना संशय, तपासातून महत्त्वाची माहिती समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
