एक्स्प्लोर
केस लुचले, फाड फाड कानशिलात लगावली, नोरा फतेहीने शूटिंग चालू असतानाच केली होती मारामारी; सांगितलं नेमकं काय घडलं होतं?
Nora Fatehi : बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री नोरा फतेहीने एक खास बाब सांगितली आहे. तिने एका कोस्टारसोबत थेट भांडण केले होते.

nora fatehi
1/8

नोरा फतेही या अभिनेत्रीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. आजघडीला तिचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तर तिच्या फोटोंना लाखोंनी लाईक्स असतात.
2/8

नोरा फतेही नुकतेच विनोदवीर कपिल शर्माच्या शोमध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी तिने रोअर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सहकालाकाराशी झालेल्या भांडणाबाबत माहिती दिली.
3/8

रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरब या चित्रपटच्या शूटिंगदरम्यान नोरा फतेहीचे तिच्या सहकलाकाराशी भांडण झाले होते. विशेष म्हणजे या भांडणात दोघांनीही एकमेकांना मारलं होतं.
4/8

नोराने सांगितलं की, तो अभिनेता माझ्याशी फारच चुकीच्या पद्धतीने वागत होता. त्यामुळे मी फारच त्रासले होते. मला त्याच्या वागण्याचा फारच राग आला आणि मी त्याला एक चापट मारली.
5/8

त्यानंतर समोरच्या अभिनेत्यानेही मला एक चापट मारली. मग तर आमच्यातील भांडण चांगलेच वाढले. आम्ही एकमेकांचे केस धरून भांडत होतो. शूटिंगच्या सेटवर बराच वेळ हे भांडण चालू होते, असेही नोराने सांगितले.
6/8

नोराने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. ती 'एन अॅक्सन हिरो' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. याच कार्यक्रमात तिने हा किस्सा सांगितला.
7/8

नोराने सांगितलेला किस्सा ऐकून सर्वांनाच हसू फुटले. नोरा फतेहीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे. यासह तिने आतापर्यंत अनेक आयटम साँग तसेच इतर गाण्यांत डान्स केलेला आहे.
8/8

अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिने परीक्षकाचेही काम केलेले आहे. लोक तिचे नृत्या आणि सौंदर्याचे दिवाने आहेत. आज ती कोट्यवधीची मालकीण आहे.
Published at : 26 Feb 2025 11:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
