Karan Johar Birthday : करण जोहरने 52 व्या वाढदिवशी केली नवीन चित्रपटाची घोषणा; चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!
Karan Johar Birthday : करण जोहरने आपल्या 52 व्या वाढदिवशी एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. करण सध्या नव्या चित्रपटाच्या संहितेवर काम करत आहे.
![Karan Johar Birthday : करण जोहरने 52 व्या वाढदिवशी केली नवीन चित्रपटाची घोषणा; चाहत्यांचा आनंद गगनात मावेना! Karan Johar Announce Next New Untitled Directorial Film on His Birthday 25 May 2024 Fans Excited Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Karan Johar Birthday : करण जोहरने 52 व्या वाढदिवशी केली नवीन चित्रपटाची घोषणा; चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/26/47d558b7eb9829ba83629aa688b84d511716687120813254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेनिर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. करणचा यंदाचा वाढदिवस खूपच खास ठरला. नेहमीप्रमाणे यंदाही करणने त्याच्या सेलिब्रिटी मित्रमंडळींसाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. दरम्यान त्याने आपल्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं. वाढदिवशी करणने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. याबद्दलचा एक खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
करण जोहरने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याच्या हातात एक संहिता दिसून येत आहे. संहितेवर लिहिलेलं आहे,"अनटाइटल्ड नॅरेशन ड्राफ्ट. डायरेक्टेड बाय करण जोहर. 25 मे 2024". फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे,"गेट सेट गो". करणच्या या पोस्टवर चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबत नव्या प्रोजेक्टसाठीही शुभेच्छा देत आहेत. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) नंतर करणच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत होते. या रोमँटिक चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 357.5 कोटींची कमाई केली. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनरअंतर्गत राजकुमार राव आणि जान्हवी कपूर अभिनीत 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' हा चित्रपट 31 मे 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शरण शर्मा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. हा क्रीडाविषयक चित्रपट आहे.
View this post on Instagram
शाहरुखसोबत करणार चित्रपट?
करण जोहरने घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. त्याच्या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शाहरुखसोबत (Shah Rukh Khan) हा चित्रपट असूदेत, कृपया शाहरुखसोबत चित्रपट करा, शाहरुख-काजोलला पुन्हा एकत्र स्क्रीनवर पाहायचं आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. करणने गेल्या 14 वर्षांपासून शाहरुखसोबत कोणताही चित्रपट केलेला नाही. किंग खानच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणने केलं आहे. करण जोहरच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. करण जोहरने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तो लोकप्रिय आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan and Karan Johar :'शाहरुख आणि करण जोहरने माझ्या नवऱ्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले', प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिकेचा मोठा गौप्यस्फोट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)