Godhra Teaser Out : अपघात की षडयंत्र? थरकाप उडवणारी घटना आता रुपेरी पडद्यावर पाहा; 'गोद्रा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Godhra : 'गोद्रा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Godhra Movie Teaser Out : आज 21 वर्षांनंतरही गुजरातमधील गोध्रा हत्याकांड (Godhra) आठवलं की अंगावर शहारे येतात. हजारोंचा बळी गेलेल्या या दुर्घटनेची जखम आजही भरुन निघालेली नाही. देशाला हादरवणाऱ्या या घटनेवर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गोध्रा' असं या सिनेमाचं नाव असून नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अंगावर शहारे आणणारा 'गोद्रा'चा टीझर! (Godhra Movie Teaser)
'गोद्रा' या सिनेमाचा 1 मिनिटाचा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. विशेष म्हणजे या टीझरमध्ये एकही कलाकार दिसत नाही. पण तरीही गोद्रा हत्याकांडातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींची झलक प्रेक्षकांना या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. हा सिनेमा 2002 च्या ग्रोधा हत्याकांडावर आधारित असून सत्य घटनांवर बेतलेला आहे, असा दावा टीझरमध्ये करण्यात आला आहे. साबरमती एक्सप्रेस, कोच एस 6, 59 हे आकडे अत्यंत ठकपणे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत.
View this post on Instagram
'गोद्रा'च्या टीझरने सिनेप्रेमींसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सिनेमात कोणते कलाकर असतील याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. अद्याप या सिनेमात कोणते कलाकार असतील, काय संवाद असतील आणि मुख्य म्हणजे सिनेमा कधी प्रदर्शित होणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. 'गोद्रा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एम.के. शिवाक्ष (MK Shivaaksh) यांनी सांभाळली आहे. तर बीजे पुरोहित आणि राम कुमार पाल या सिनेमाची निर्मिती करत आहेत.
'गोद्रा'च्या टीझरमध्ये अपघात की षडयंत्र? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. गोद्रा हत्याकांडावर भाष्य करणारे काय 'पो छे', 'परजानिया', 'फिराक' हे सिनेमे आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आता 'गोद्रा' या सिनेमात काय वेगळं पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
गोद्रा हत्याकांड प्रकरण काय आहे?
27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील (Gujarat) गोद्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसच्या (Sabarmati Express) एस-6 या बोगीला आग लावण्यात आली. अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गुजरातमध्ये अनेक दंगली उसळल्या. या दंगलीत 2000 हून अधिक लोकांना आपला जीव जमवावा लागला.
संबंधित बातम्या
गोध्रा हत्याकांड : 11 जणांची फाशी रद्द, सर्व 31 आरोपींना जन्मठेप!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
