(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhanush - Aishwarya : हम साथ साथ हैं? घटस्फोटानंतर देखील धनुष आणि ऐश्वर्या हैदराबादमधील हॉटेलात एकत्र
Dhanush - Aishwarya : धनुष आणि ऐश्वर्याने 17 जानेवारी रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याचे जाहीर केले होते.
Dhanush - Aishwarya : अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले. धनुष आणि ऐश्वर्याने 17 जानेवारी रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याचे जाहीर केले होते. पण सध्या दोघेही हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजतंय. तसेत ते एकत्र काम करत असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, धनुष आणि ऐश्वर्या दोघेही रामोजी राव स्टुडिओच्या सितारा हॉटेलमध्ये थांबले आहेत. धनुष त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी तिथे थांबला आहे. तर ऐश्वर्या तिच्या गाण्यासाठी तिथे थांबली आहे. ऐश्वर्याचं नवीन गाणं हे खास व्हॅलेंटाईन डे साठी आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर शूट करण्यासाठी ऐश्वर्या तिथे थांबली आहे. पुढच्या तीन दिवसात या गाण्याचं शूटिंग पूर्ण होईल. दरम्यान, धनुष आणि ऐश्वर्या यांची कामादरम्यान, भेट झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
View this post on Instagram
असं झालं होतं लग्न
अफेअरच्या अफवेमुळे धनुष आणि ऐश्वर्या दोघेही हैराण झाले होते. त्यावेळी धनुष 21 वर्षांचा तर ऐश्वर्या 23 वर्षांची होती. मग या दोघांनीही लग्न करावं असं दोघांच्या घरच्यांनी मागणी केली. त्यानंतर अगदी घाईगडबडीत, 18 नोव्हेंबर 2004 रोजी या दोघांचे लग्न पार पडलं. हे लग्न रजनीकांत यांच्या घरी झालं. या दोघांना दोन मुलं असून राजा आणि लिंगाराजा असं त्यांची नावं आहेत. आता या दोघांनी 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या
Pushpa Unknown Facts : अल्लू अर्जुनच्या मेकअपसाठी लागायचे तासनतास, तर चित्रपटाच्या एका गाण्यात तब्बल 1 हजारांहून अधिक लोकांचा सहभाग
ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर येतोय कपिल शर्माचा नवा शो, या आठवड्यात आणखी काय प्रदर्शित होतंय? घ्या जाणून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha