Pushpa Unknown Facts : अल्लू अर्जुनच्या मेकअपसाठी लागायचे तासनतास, तर चित्रपटाच्या एका गाण्यात तब्बल 1 हजारांहून अधिक लोकांचा सहभाग
Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील लूकची चर्चा लूकची सर्वत्र होतेय. मात्र,अल्लू अर्जुनने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अल्लूपासून ते पुष्पाच्या भूमिकेत येण्यासाठी त्याला तासनतास लागायचे.
Pushpa Unknown Facts : खरंतर, 'पुष्पा:द राइज' (Pushpa Movie) हा चित्रपट प्रदर्शित होऊन 1 महिन्याहून जास्त काळ ओलांडला आहे. पण, अजूनही या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते अल्लू अर्जुनच्या अभिनयापर्यंत चाहत्यांना सर्वच गोष्टी आवडल्या आहेत. म्हणूनच अजूनही हा चित्रपट लोकांच्या जवळचा आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसली होती, जी श्रीवल्लीच्या भूमिकेत चांगलीच लोकांना आवडली होती. या चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अल्लू अर्जुनला (Allu Arjun) पुष्पाच्या भूमिकेत येण्यास तासनतास लागायचे
अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. अल्लूपासून पुष्पा बनवायला त्यांना तासनतास लागायचे. मीडिया रिपोर्ट्सवर, अल्लू अर्जुनच्या मेकअपसाठी तब्बल दोन तास लागायचे. त्यानंतरही हा मेकअप काढण्यासाठी देखील तेवढाच वेळ लागायचा. त्यामुळे अल्लूने त्याच्या भूमिकेला खूप वेळ दिला होता.
खऱ्या जंगलात शूटिंग
पुष्पा सिनेमाचं शूटिंग आंध्र प्रदेशातल्या एका जंगलात झालं होतं. खरंतर, जंगलात शूटिंग करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत अनेक आव्हानांवर मात करत पुष्पा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. सगळ्यात मोठी अडचण होती ती जंगलात जायची. कारण जंगलात अनेक ठिकाणी रस्ता नसल्याने कच्चा रस्ता तयार करण्यात आला.
या गाण्यात होता जवळपास 1 हजार लोकांचा सहभाग
पुष्पा चित्रपटाच्या 'सामी सामी' या गाण्यात जवळपास 1 हजार लोकांनी सहभाग घेतला. खरंतर, इतक्या मोठ्या संख्येने लोकांसोबत शूटिंग करणे सोपे नाही. पण गाण्याच्या मागणीनुसार शूटिंग करण्यात आले. पुष्पा चित्रपटाचे प्रत्येक गाणे जबरदस्त हिट झाले आहे.
पोलिसांनी खरी तस्करी थांबवली तेव्हा
चित्रपटाचा काही भाग केरळमध्ये शूट करण्यात आला आहे. जिथे कृत्रिम चंदनाचे गठ्ठे वापरण्यात आले. मात्र, त्याच दरम्यान असे काही घडले की, पोलिसांनी ते खरे चंदन असल्याचे समजून संपूर्ण टीमला पकडले. मात्र, नंतर त्यांना समजावून सांगितल्यानंतर प्रकरण मिटले.
महत्वाच्या बातम्या :
- Tara Sutaria-Aadar Jain Love Story : तारा सुतारिया आणि आदर जैनची लव्हस्टोरी फुल्ल टू फिल्मी!
- Shahrukh Khan : शाहरुख खानने इजिप्तच्या चाहत्याचे मानले आभार, नेमकं काय आहे कारण?
- ROHILEEचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, पुण्याच्या ढेपेवाढ्यात बांधली लग्नगाठ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha