ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर येतोय कपिल शर्माचा नवा शो, या आठवड्यात आणखी काय प्रदर्शित होतंय? घ्या जाणून
Movies and Shows Releasing In January : गेल्या एक आठवड्यापासून 'पुष्पा' सिनेमा आणि दोन सीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.
Movies and Shows Releasing In January 2022 : गेल्या एका आठवड्यापासून 'पुष्पा' सिनेमा आणि दोन सीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा', शेफाली शाहची 'ह्यूमन' आणि ताहिर भसीनची 'ये काली काली आंखे' वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. दरम्यान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा येत्या आठवड्यात ओटीटी गाजवणार आहे.
तडप (Tadap) : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 'तडप' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता अहानचा 'तडप' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मिन लुथरिया यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे की, 'तडप' डिज्नी प्लस हॉट स्टारवर 28 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटामध्ये अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
कपिल शर्मा - 'आय एम नॉट डन येट' : छोटा पडदा गाजवल्यानंतर आता कपिल शर्मा ओटीटीवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिलचा 'आय एम नॉट डन येट' हा शो लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या शोमध्ये कपिल त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी प्रेक्षकांना सांगताना दिसणार आहे. हा शो 28 जानेवारीला रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
पवित्र रिश्ता सीझन 2 : अंकिता लोखंडे आणि शाहीर शेख यांची मालिका 'पवित्र रिश्ता सीझन 2' देखील 28 जानेवारीपासून झी 5 वर सुरू होत आहे. पवित्र रिश्ताच्या पहिल्या सीझनमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती, जी आता शाहीर साकारत आहे.
संबंधित बातम्या
Tara Sutaria-Aadar Jain Love Story : तारा सुतारिया आणि आदर जैनची लव्हस्टोरी फुल्ल टू फिल्मी!
Shahrukh Khan : शाहरुख खानने इजिप्तच्या चाहत्याचे मानले आभार, नेमकं काय आहे कारण?
ROHILEEचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, पुण्याच्या ढेपेवाढ्यात बांधली लग्नगाठ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)