Anushka Sharma Pregnant : अनुष्का शर्मा 7 महिन्यांची गरोदर? व्हायरल फोटोमागचं सत्य समोर
Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोनंतर अभिनेत्री सात महिन्यांची गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे.

Anushka Sharma Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा आहे. अशातच अभिनेत्रीचे बेबी बंप दाखवतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे अनुष्का सात महिन्यांची प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली आहे.
व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
अनुष्काने व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सोनेरी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तर विराटनेदेखील पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याचं फॅक्ट चेक करण्यात आलं. फॅक्ट चेकनुसार, अनुष्काचा व्हायरल होणारा फोटो हा 2018 च्या दिवाळीमधला जुना फोटो आहे. या फोटोला थोडं एडिट करण्यात आलं आहे. अनुष्का-विराटच्या लग्नाच्या सहाव्या वाढदिवशी चाहत्यांनी हा फोटो व्हायरल केला आहे.
चाहत्यांना गुड न्यूजची प्रतीक्षा
अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. अभिनेत्रीला एका मॅटरनिटी क्लिनिकजवळ स्पॉट करण्यात आलं होतं. पापरांझींना त्यांनी मॅटरनिटी क्लिनिकमधले फोटो शेअर करण्यास नकार दिला होता. योग्य वेळ आली की ते स्वत: चाहत्यांना गुड न्यूज देतील. चाहत्यांना आता फक्त गुड न्यूजची प्रतीक्षा आहे.
अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! (Anushka Sharma Upcoming Movie)
अनुष्का शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. 'जीरो' या सिनेमात ती शेवटची झळकली होती. 2018 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' (Chakda xpress) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. आता प्रेक्षकांना अनुष्काच्या या सिनेमाची प्रतीक्षा आहे.
विराट अनुष्काचा शाही विवाहसोहळा
विराट-अनुष्काचा शाही विवाहसोहळा होता. 50 खास पाहुण्यांच्या उपस्थित इटलीमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळा पार पडलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यक्तीचा राहण्याचा खर्च एक कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवरच विरुष्काने 50 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
'विरुष्का' करतात कोट्यवधींची कमाई!
विराट आणि अनुष्का कमाईच्या बाततीत खूपच पुढे आहेत. जीक्यू इंडिया मॅक्झिनच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती जवळपास 900 कोटींच्या आसपास आहे. तर अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 350 कोटींच्या आसपास आहे. अनुष्काने आतापर्यंत 19 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तसेच तिचं स्वत:चं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे.
संबंधित बातम्या
Virat Kohli Anushka Sharma : मैत्री, प्रेम, ब्रेकअप ते लग्न; 'अशी' आहे विराट-अनुष्काची 'प्यारवाली लव्हस्टोरी'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
