Kiran Mane : 'पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर...' किरण मानेंच्या पोस्टची जोरदार चर्चा
सोशल मीडियातून प्रभावीपणे पोस्ट करून लक्ष वेधून घेणाऱ्या किरण माने यांच्या आणखी एका व्हायरल पोस्टची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Kiran Mane : सोशल मीडियातून प्रभावीपणे पोस्ट करून लक्ष वेधून घेणाऱ्या किरण माने यांच्या आणखी एका व्हायरल पोस्टची चर्चा चांगलीच रंगली आहे. किरण माने यांनी यांनी आपल्या पोस्टमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर बिळात लपून बसणारा पण विशाळगडावर मशिद आहे यासाठी शिरा ताणून बोंबलणारा बहुजन पोरगा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात असंल तर ओळखून जा की तो पोरगा एका कारस्थानी जाळ्यात अडकलाय, असे म्हटले आहे.
काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
...एका बाजूला छ. संभाजीराजांविषयी आपल्या पुस्तकांमधून बदनामीकारक मजकूर लिहीणार्या अनेक भिकारचोटांना 'वंदनीय', ‘पूजनीय’, ‘आदरणीय’ वगैरे मानणार्या… आणि दुसर्या बाजूला शंभूराजांवरच्या सिरीयली-सिनेमांना 'इतिहास' मानून मगरीचे अश्रू ढाळणार्या, एका भुक्कड जमातीत तुमचं पोरगं मिसळलं असेल तर कुणीतरी ठरवून त्याचं भविष्य नासवतंय हे ओळखा. ...बहुजन पोरांच्या आयुष्याशी हा खेळ कोण,कसा आणि का खेळतंय हे समजून घेण्यासाठी दत्तकुमार खंडागळे यांनी लिहीलेलं पुस्तक वाचण्याचं हे परफेक्ट टायमिंग आहे.
...या पुस्तकाबाबतीत एक दुर्दैवी घटना घडली पण त्यामुळं नंतरच्या काळात लै लोकांपर्यन्त ते पोचलं. भिमा कोरेगांवला या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका माणसाचा फोटो पाहून लोकांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं या माणसाची भलावण करणारं हे पुस्तक आहे... त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली... लोकांनी अक्षरश: ती पुस्तकं फाडून रस्त्यावर फेकून दिली. तो फोटो पायाखाली तुडवला.
…नंतर लोकांना कळलं की त्या फोटोतल्या व्यक्तीच्या षडयंत्राची पोलखोल करणारं हे पुस्तक आहे. याचा लेखक दुसरा तिसरा कुणी नसून त्या माणसाचाच एक भानावर आलेला जुना अनुयायी आहे ! मग अनेक लोकांपर्यंत हे पुस्तक पोचलं. नंतर मुखपृष्ठावरचा फोटो काढून टाकला आणि गौरव सर्जेराव या अत्यंत प्रतिभावान व्यंगचित्रकारानं अतिशय समर्पक चित्र काढलं. “मी फसलो होतो, पण यानंतर कुठला तरुण या घातकी सापळ्यात अडकू नये.” या हेतूनं लेखकानं हे पुस्तक लिहिलंय. अतिशय जवळून त्यानं ही कार्यपद्धती पाहिल्यामुळं या पुस्तकाला सत्याचा आधार आहे.
'शिवराय आणि धर्म' या नावावर बहुजन पोरासोरांना भरकटवून एका दळभद्री विचारधारेच्या बळकटीकरणासाठी त्यांना कसं वापरलं जातं, हे या पुस्तकात ‘इस्कटून’ सांगितलं आहे. मेंदूत खोट्या इतिहासाचं विष पेरून आणि मनात खोटा धर्माभिमान मुरवून आपल्या पोरांना दंगलीत शस्त्र म्हणून वापरण्याच्या कपटापासून वाचवायचं असेल तर प्रत्येकानं हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. आज लै गरज आहे भावांनो. आपल्या घराघरात, खेडोपाडी हे पुस्तक जायला पाहिजे. अनेक लहान मुलं आणि तरूणांना ठरवून बरबाद केलं जातंय. वर्चस्व गाजवण्याच्या विषारी हव्यासापायी, 'बहुजन विरूद्ध बहुजन' अशी कळ लावू पहाणार्यांना वेळीच रोखण्याची आज गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























