Tamil Nadu Language Controversy : तमिळनाडूत 'हिंदी'विरोधात पुन्हा रान उठण्याची चिन्हे, 60 वर्षांपूर्वींच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली, फलकांना काळं फासण्यास सुरुवात
स्टॅलिन म्हणाले की, द्रविड चळवळ 85 वर्षांपासून तामिळांच्या रक्षणासाठी लढत आहे. गेल्या 75 वर्षांत भारतातून 52 भाषा नामशेष झाल्या असून एकट्या हिंदी पट्ट्यात 25 भाषा नामशेष झाल्या आहेत.

Tamil Nadu Language Controversy : केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये तीन भाषांच्या अंमलबजावणीवरून (तमिळ, हिंदी, इंग्रजी) शाब्दिक युद्ध सुरू आहे. रविवारी द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी कोईम्बतूरमधील पोल्लाची रेल्वे स्टेशनच्या फलकावरील काळंं फासून स्टेशनचे हिंदी नाव पुसून टाकले. शनिवारी सीएम एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. तामिळनाडू पालक-शिक्षक संघाच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणावर स्वाक्षरी करण्यासाठी केंद्र सरकारने 2 हजार किंवा 10 हजार कोटी रुपये दिले तरी मी त्यावर स्वाक्षरी करणार नाही. ते म्हणाले होते की जर राज्याने 2,000 कोटी रुपयांचे अधिकार सोडले तर तामिळ समाज 2,000 वर्षे मागे जाईल. मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन असे पाप कधीच करणार नाहीत.
द्रविड चळवळ 85 वर्षांपासून तामिळांच्या रक्षणासाठी लढत आहे
स्टॅलिन म्हणाले की, द्रविड चळवळ 85 वर्षांपासून तामिळांच्या रक्षणासाठी लढत आहे. गेल्या 75 वर्षांत भारतातून 52 भाषा नामशेष झाल्या असून एकट्या हिंदी पट्ट्यात 25 भाषा नामशेष झाल्या आहेत. हिंदीच्या वर्चस्वामुळे आपल्या मातृभाषा गमावलेल्या राज्यांना आता सत्याची जाणीव होत आहे.
त्रिभाषा सूत्र काय आहे ते जाणून घ्या
- NEP 2020 अंतर्गत, विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकावी लागतील, परंतु कोणतीही भाषा अनिवार्य करण्यात आलेली नाही. राज्यांना आणि शाळांना त्यांना कोणत्या 3 भाषा शिकवायच्या आहेत हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे.
- प्राथमिक वर्गात (इयत्ता 1 ते 5) मातृभाषा किंवा स्थानिक भाषेत अभ्यास करण्याची शिफारस केली जाते. तर इयत्ता 6 वी ते 10 मध्ये 3 भाषा शिकणे अनिवार्य आहे. गैर-हिंदी भाषिक राज्यात ती इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा असेल. शाळांची इच्छा असल्यास, ते माध्यमिक विभागात म्हणजे 11वी आणि 12वी मध्ये पर्याय म्हणून परदेशी भाषा देखील देऊ शकतात.
- बिगर-हिंदी भाषिक राज्यांमध्ये, इयत्ता 5 वी पर्यंत हिंदी ही दुसरी भाषा म्हणून आणि जिथे शक्य असेल तिथे मातृभाषा, स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेत शिकवण्यावर भर दिला जातो. त्याच वेळी, बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये, हिंदी ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जाऊ शकते. तसेच, हिंदी भाषिक राज्यांमध्ये दुसरी भाषा म्हणून इतर कोणतीही भारतीय भाषा (उदा. तमिळ, बंगाली, तेलगू इ.) असू शकते.
- कोणतीही भाषा स्वीकारणे बंधनकारक नाही, तीनपैकी कोणती भाषा शिकवायची हे ठरवण्याचे स्वातंत्र्य राज्यांना आणि शाळांना आहे. कोणतीही भाषा सक्तीची लादण्याची तरतूद नाही.
द्रमुकचा जुना इतिहास
दरम्यान, हिंदी विरोध हा तमिळनाडूमध्ये मोठा इतिहास राहिला आहे. द्रमुकने सूचित केले की तामिळनाडूला केंद्रीय निधीच्या वाट्याच्या बदल्यात हिंदीसह त्रिभाषा धोरण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लागू करण्यास सांगितले जात आहे. द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन म्हणाले की, जोपर्यंत ते आणि त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत ते तमिळ भाषा, राज्य आणि तेथील लोकांविरुद्ध कोणतीही कृती होऊ देणार नाहीत. तमिळनाडूमध्ये हिंदी लादणे हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि 1965 मध्ये द्रमुकने मोठ्या प्रमाणावर हिंदीविरोधी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले होते. या आंदोलनादरम्यान अनेक तमिळ समर्थक कार्यकर्त्यांनी भाषा लादण्याच्या विरोधात बलिदान दिले आणि अनेकांनी आत्महत्या सुद्धा केल्या होत्या. प्रमुख विरोधी पक्ष AIADMK ने सुद्धा NEP बाबत केंद्रावर निशाणा साधला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















