एक्स्प्लोर

Vinayak Pande on Neelam Gorhe : संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून...

Vinayak Pande on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला होता.

Vinayak Pande on Neelam Gorhe : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. निलम गोऱ्हे ही निर्लज्ज, नमकहराम बाई आहे, असे त्यांनी म्हटले. तर, नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना (Vinayak Pande) उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय. 

विनायक पांडे म्हणाले की, 2014 ची विधानसभा निवडणूक लागली, मी आणि अजय बोरस्ते दोघे ही इच्छुक होतो. नीलम गोऱ्हे यांचा भैय्या बहाते कार्यकर्ते होता. त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलायचे का असे सांगितले. तेव्हा मी हो सांगितले. नीलम ताईंना काही रक्कम दिली. त्यानंतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आले. मी त्यांना सांगितले मला पैसे द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलवून पैसे दिले. मात्र, त्यात काही पैसे कमी दिले आहेत, असा दावा त्यांनी केला. 

नीलम ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले

विनायक पांडे पुढे म्हणाले की, शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसे मागितले नाही. पण नीलम ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले. आता राज्यभरातून असे अनेक कार्यकर्ते पुढे येतील. मराठी साहित्य संमेलन होते तिथे त्यांनी अशी भूमिका मांडायला नको होती. आता राज्यातील अनेक नेते पुढे येतील. पैसा दिल्याशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नव्हती. मला 43 वर्ष झाली, मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी कायम खुले होते. या बाईने जिथे जिथे संपर्क नेते होते, तिथे असेच केले आहे. तिकीटासाठी माझ्याकडे पैसे मागितले, स्पर्धा होती म्हणून पैसे मागितले. पण, तिकीट अजय बोरस्ते यांना दिले. मी उपमहापौर, महापौर झालो. पण कधीच पैसे दिले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut On Neelam Gorhe: निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे बाईमाणूस, भ्रष्ट...; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे!

Sanjay Raut: उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget