Asaduddin Owaisi : बनारसमध्ये नरेंद्र मोदींना कमी मतदान झालं, तिथे धर्मयुद्ध होतं की व्होट जिहाद? असदुद्दीन ओवेसी यांची सडकून टीका
बनारसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान कमी झालं, तिथं धर्मयुद्ध होतं की व्होट जिहाद होतं? अयोध्यामध्ये भाजपचा उमेदवार हरला, हे नेमकं काय आहे? असा सवाल खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थिती केलाय.
Asaduddin Owaisi on Vote Jihad : व्होट जिहादची व्याख्या काय आहे? बनारसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान कमी झालं, तिथं धर्मयुद्ध होतं की व्होट जिहाद होतं? अयोध्यामध्ये भाजपचा उमेदवार हरला, हे नेमकं काय आहे? महाराष्ट्रात लोकसभेच्या अनेक जागा तुम्ही हरलात ते काय होतं. गुजरातमध्ये देखील जागा हरलात ते काय आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे त्यांनी तत्काळ या सर्व गोष्टींची दखल घ्यावी. हे धर्माची भाषा वापरत आहे. सातत्याने धर्मयुद्ध, धर्मयुद्ध म्हणत आहेत, काय आहे हे धर्मयुद्धे? एनसीआरबीचा डेटा आहे सगळ्यात जास्त हेट स्पीच महाराष्ट्रात 2023 मध्ये झाली आहेत. याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्या झाली यामागे कोण मास्टर माईंड आहे हे अजून शोधलं नाही. यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे केवळ हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम करत आहेत, हाच त्यांचा मूळ चेहरा आहे. अशी घणाघाती टीका एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी उपस्थिती करत विविध मुद्यांवर भाष्य केलंय.
देश प्रेमाशिवाय तुम्हाला काहीही सापडणार नाही- असदुद्दीन ओवेसी
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल यवतमाळच्या वणी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. मात्र हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच उद्धव ठाकरे यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. तर त्यांनी तपासणी होत असताना व्हिडिओ काढत तो प्रसारित देखील केला. माझी बॅग तपासली तशी सत्ताधाऱ्यांची देखील बॅग तपासा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आता याच मुद्यावरून खासदार असदुद्दीन ओवेसी यांना विचारले असता ते म्हणाले कि, माझं म्हणणं आहे माझी प्रत्येक वस्तू चेक करा, तुम्हाला काहीही सापडणार नाही. केवळ देश प्रेमाशिवाय तुम्हाला काहीही सापडणार नाही. असा टोला ओवेसी यांना लगावला आहे.
हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही- असदुद्दीन ओवेसी
हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही. आम्हाला 70 वर्षांपासून तुम्ही म्हणताय तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा. आम्ही कुठे जाणार नाही. त्यांना जायचं होतं ते 1947 लाच निघून गेले. आमचे पूर्वज ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं ते कुठेही जाणार नाहीत. आम्ही इथेच राहणार, संविधानाला मजबूत करणार. देशाला वाचवणार लोकशाहीला मजबूत करणार. देवेंद्र फडणवीस लहान मुलांसारख्या गोष्टी करत आहेत. त्यांना सांगणं आहे शाळेत जा आणि तिथे जाऊन लहान मुलांना चॉकलेट देऊन असल्या गप्पा मारा. आम्ही राजकारण समजतो आम्ही कुठेही जाणार नाही इथेच थांबणार. यांच्या डोळ्यात डोळे घालून आमच्या हक्काचा मुद्दा आम्ही मांडत राहणार आहोत. असा पलटवारही असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर भाष्य करत केला आहे.
आणखी वाचा