एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी

Devendra Fadnavis Vs Asaduddin Owaisi: देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार, असदुद्दीन ओवेसींचं भाकीत

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे भाजपचा अनेक जागांवर पराभव झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण मग अयोध्येतही तुमचा पराभव कसा झाला? तिकडे तुम्हाला मतं का मिळाली नाहीत, असा सवाल एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांच्या जिभेवर काल माझे नाव आले. पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्षात ठेवावे की, तुम्ही माझा सामना करु शकत नाही. मोदी-शाह आले तरी फडणवीस माझा सामना करु शकत नाहीत, असे ओवेसी यांनी म्हटले. ते रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस सातत्याने 'व्होट जिहाद', 'धर्मयुद्ध', असे शब्द बोलत असतात. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का? फडणवीस तुम्ही काही आमदार विकत घेतले, मग तुम्हाला चोर किंवा दरोडेखोर म्हणावे का? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना ते रोखण्याची तुमची हिंमत झाली नाही का? फडणवीस तुम्हाला औरंगाबादला जे आणायचं आहे ते येणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या तोंडातून मनोज जरांगे यांचं नाव निघेल का? ते नेहमी 'जिहाद' 'जिहाद' बोलत असतात, अशी टीका ओवेसी यांनी केली.

फडणवीसांचे पूर्वज नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: ओवेसी

इंग्रज आणि मराठे युद्ध झाले, तेव्हा मुस्लिम मराठ्यांसोबत होते. मालेगावच्या किल्ल्यावर मुस्लिम उभे राहिले आणि इंग्रजांना हरवलं. ते फडणवीस तुमचे पूर्वज नव्हते ते ओवेसीचे पूर्वज होते. लढाईत मरणाऱ्यांमध्ये तुमचे पूर्वजाचे नाव होते का? नाही तर ओवेसीच्या बापाचे नाव होते. तुमचा हिरो मात्र इंग्रजांना लव्ह लेटर लिहून 'आय लव्ह' लिहत होता. देवेंद्र फडणवीस सतत 'लव्ह जिहाद' झाला, 'लँड जिहाद' झाला, असे म्हणतात. जिथे तुम्हाला मत मिळाले नाही, तिथे व्होट जिहाद झाले. मग तुम्ही अयोध्येत कसे हरलात, हे सांगा, असा सवाल ओवेसींनी विचारला.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; ओवेसींचं भाकीत

शिंदे फडणवीस तुम्हाला लाज वाटत नाही का, शहरात आठ दिवसाला पाणी येत आहे, कचरा वाढला आहे. फडणवीस तुम्ही औरंगाबादला पाणी दिले नाही. यांच्याकडून काही होत नाही, हे फक्त हिंदू मुस्लिम करतील. मोदी म्हणतात 'एक है तो सेफ है'. 10 वर्षात मग आम्ही सेफ नव्हतो का? मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाने फसवणूक करण्यात आली. हे सर्व मिठाई वाटत आहेत. त्यामुळे सोडू नका, मिठाई खा. पण मतदान पतंगाला करा. 1500 मिळत आहेत ते घेऊन टाका, पण मतदान पतंगाला करा. घाबरण्याची तुम्हाला गरज नाही. फडणवीस तुम्ही मुख्यमंत्रीचे स्वप्नं पाहत आहेत, पण तुमच्या स्वप्नांवर माती पडणार आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली.

आणखी वाचा

भर सभेत फोन, पुढची सभा रद्द; भाषण सुरु असताना मंचावर नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी सर्व सांगितलं, Video

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget