Ajit Pawar: शिवरायांवरील संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; गुरुजींना फटकारलं
Ajit Pawar on Sambhaji Bhide Statement about Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, भिडे म्हणालेत.

सांगली: शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी व्यक्त केलं. त्यांच्या वक्तव्यनंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत, याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, त्यांना जे वाटतं ते बोलू शकतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते. राजा कसा असावा हे जगानं मान्य केलं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. (Chhatrapati Shivaji Maharaj)
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी म्हटलं आहे. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, असं संभाजी भिडे (Bhide Guruji) यांनी केलं आहे. ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Bhide Guruji in Sangli)
संभाजी भिडे यांनी शहाजी राजांचा उल्लेख करत ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या मताचे होते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी शहाजी राजांचा (Shahaji Raje) हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे नेला. हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, असे भिडे यांनी म्हटले. सध्या छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) श्रद्धांजली म्हणून बलिदान मास पाळण्यात येत आहे. शनिवारी सांगलीत (Sangli News) शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी साडेसात वाजता मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)



















