Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात
Rakul Preet Brother's Aman Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंहला अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
हैदराबाद : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा (Rakul Preet Singh) भाऊ अमन प्रीत सिंहला अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंह ड्रग्स केसमध्ये अडकला आहे. हैदराबादमध्ये अमनसोबत 5 जणांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत कोकेन रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात 30 जणांची नावं समोर आली आहे. तेलंगाणा अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंटने या अंमली पदार्थाच्या टोळीचा पितळ उघड पाडलं आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक
हैदराबाद पोलिसांच्या पथकाने ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात अमन प्रीत सिंगसह 30 जणांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी आतापर्यंत अमनसह पाच ग्राहकांना अटक केली आहे. रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंह आणि इतर चार जणांना सोमवारी हैदराबाद पोलिसांनी कथित ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी विभागाला 2.6 किलो कोकेन हैदराबादला विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पोलिसांनी अमनसह इतर आरोपींना अटक केली आहे.
अमन प्रीत सिंहसह पाच जण तुरुंगात
पाचही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अमन प्रीत सिंह, अनिकेत रेड्डी, प्रसाद, मधुसूदन आणि निखिल दमन अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. सायबराबाद पोलिसांचे डीसीपी श्रीनिवास म्हणाले की, "अंमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या पाच जणांना आम्ही अटक केली आणि त्यांना पोलिस ठाण्यात आणलं. लघवी तपासणीमध्ये हे सर्व पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्वांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता आम्ही त्याला सविस्तर वैद्यकीय चाचण्यांसाठी पाठवत आहोत."
View this post on Instagram
दरम्यान, अमन प्रीत सिंहची बहिण अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला 2022 आणि 2021 मधील अंमली पदार्थांची तस्करी आणि वापर प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं होते. गेल्या वर्षीही तपास यंत्रणेने याप्रकरणी तिची चौकशी केली होती. रकुलप प्रीसशिवाय अभिनेता राणा दग्गुबती, चार्मे कौर, नवदीप, रवी तेजा आणि पुरी जगन्नाध यांनाही ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :