(Source: ECI | ABP NEWS)
Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 March 2025 : ABP Majha : Maharashtra News :
एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे फडणवीसांची तक्रार केली, पहाटे ४ वाजता शाहांची भेट घेऊन शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केली, संजय राऊतांचा मोठा दावा.
सरकारमध्ये आपली प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मुख्यमंत्री होतो, मात्र आज माझे सर्व निर्णय फिरवले जातायत, एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे तक्रार केल्याचा शिंदेंचा दावा.
तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, अमित शाहांचा शिंदेंना सल्ला, संजय राऊतांचा दावा, आमचे १२५ लोकं निवडून आलेत, त्यामुळे तुम्ही सीएम होऊ शकत नाही, भाजपचाच सीएम होणार, असंही शाहांनी शिंदेंना सांगितल्याचा राऊतांचा दावा.
पुण्यातील हॉटेलमध्ये शाहांसोबत झालेला संवाद खोट होता, हे शिंदेंनी सावरकरांची शपथ घेऊन सांगावं, संजय राऊतांचं शिंदेंना आवाहन.
संजय राऊतांकडे मी लक्ष देत नाही, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका, भ्रमिष झालेल्या लोकांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, विखेंची राऊतांवर प्रतिक्रिया.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेदरम्यान छेडछाड, काही टवाळखोर मुलांनी त्यांच्या मनाविरूद्ध फोटो काढण्याचा केला प्रयत्न.
मंत्र्याच्या मुलीसोबत छेडछाडीचे प्रकार होत असतील, तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिला भगिनींना गृहमंत्री न्याय कसा देणार? रक्षा खडसेंचा सवाल, महिला सुरक्षेसाठी गृह खाते अपयशी ठरल्याचीही केली टीका.
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडीचं प्रकरण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश, तरुणांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी.
All Shows


































