Jalna Crime News : गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वाद; जालन्यात तरुणाने चक्क स्वतःला पेटवून घेतलं; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
Jalna Crime News : जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटून घेतल्याची खळबळजनक घटना घडलीय.
जालना : जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटून घेतल्याची खळबळजनक घटना घडलीय. हि संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून काल रात्री दहा वाजेच्या दरम्यान जालन्यातील वाटुर फाटा येथे ही घटना घडलीय. प्रल्हाद भगस असं स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून (Jalna Crime News) त्याने स्वतःला जाळून घेतल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.
दरम्यान या आगीमध्ये हा तरुण जवळपास 50% भाजला असून त्याच्यावर जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जालना-नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला द्या; अन्यथा..
जालना- नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जात असलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही जमीन देणार नसल्याचा पवित्रा परभणीच्या करडगाव येथील शेतकऱ्यांनी घेतलाय. योग्य मोबदला तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी गावातील ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. परिणामी हे गावकरी ग्रामपंचायत समोर उपोषणा बसले असून जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच योग्य मोबदला दिला तरच जमिनीत पाय ठेवू देवू असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.
मालवाहुची दुचाकीला धडक, तिघे ठार
मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झालाय. या अपघातात दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका जखमीचा उपचारदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सावंगी मेघे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा-यवतमाळ महामार्गावर नवीन रेल्वे पुलाजवळ घडलाय.
पुढे आलेल्या माहितीनुसार, सालोड हिरापूर येथील कृष्ण ठाकरे (१४) हे बोरगाव मेघे येथील दोन मित्र अभय चोरसिया (१९), वैभव भंडारे (२२) यांच्यासोबत मोपेडवर ट्रिपल सीट घेऊन सालोड हिरापूरहून सावंगी मेघे कडे जात होते. दरम्यान, महामार्गांवर असलेल्या नवीन पुलाजवळ समोरून आलेल्या मालवाहुने मोपेडला धडक दिली.
हे ही वाचा