Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Hingoli Firing : हिंगोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका कॉन्स्टेबलने आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला होता.

Hingoli Firing : हिंगोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका कॉन्स्टेबलने आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार (Hingoli Firing) केला होता. या गोळीबारात त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर चिमुकल्यासह सासू आणि मेव्हणा गंभीर जखमी झाला होता. यामुळे हिंगोलीत मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील मेव्हण्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात विलास मुकाडे याचे सासू-सासरे कुटुंबासह वास्तव्यास होते. तिथे विलास मुकाडे याची पत्नीदेखील गेली होती. सततच्या भांडणामुळे घटस्फोट घेण्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्याच वादातून हिंगोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या विलास मुकाडे याने कुटुंबीयांवर गोळीबार केला. आरोपी विकास मुकाडे याने चार राऊंड फायर केले होते. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पत्नीनंतर मेव्हण्याचाही उपचारादरम्यान मृत्यू
या गोळीबारात विकास मुकाडे याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता तर सासू, मेव्हणा आणि चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, विलास मोकाडेच्या मेव्हण्याचा आज उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गोळीबाराच्या प्रकरणातील मृत्यूची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. तर सासूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परभणीत पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
दरम्यान, परभणीत मैना काळे या महिलेला तिन्ही मुली झाल्यामुळे तिचा नवरा कुंडलिक उत्तम काळे हा शिवीगाळ करुन मारहाण करत होता. अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण होत होते. 26 डिसेंबरला रात्री कुंडलिक काळे याने रागाच्या भरात मैना काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापासून तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुंडलिक काळे याच्यावर कोतवाली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
