Ravindra Dhangekar: भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप
Ravindra Dhangekar: भाजपचे अनेक नेते हे पब पार्टनर असून या पार्टनरशिपमध्ये हे सगळे चालतात आणि यातून गुन्हेगारी तयार होते. असा खळबजनक आरोप माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय.

Ravindra Dhangekar on Pune Crime : पुणे शहरातील गुन्हेगारी (Pune Crime) वाढली असून पोलिसांचे काम देखील वाढले आहे. मात्र यावर सत्ताधारी बोलायला तयार नाही. पुण्याची परिस्थिती खराब झाली आहे. पब संस्कृती पुण्यात आली याला जबाबदार कोण आहे? भाजपचे (BJP) अनेक नेते हे यात पार्टनर आहेत आणि या पार्टनरशिपमध्ये हे सगळे पब चालतात आणि यातून गुन्हेगारी तयार होते. असा खळबजनक आरोप करत माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मारणे टोळीवर गुन्हा दाखल केला पण 2 एफआयआर केले, असं काय घडलं की एफआयआरमध्ये कलम वाढले गेले. चंद्रकांत दादा (Chandrakant Patil) आहेत का मोहोळ आहेत यांच्या वादात हा (गजानन मारणे) बळी गेला आहे का? असा सवाल ही रवींद्र धंगेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
'ते' कुणच्या आशीर्वादाने बाहेर आले?
निवडणुकीत हे (मारणे टोळी) कोणाचा प्रचार करत होते? दादांना जास्त मदत केली म्हणून हा त्रास आहे का? कि मोहोळ यांना कमी मदत केली म्हणून हा त्रास आहे, असेही रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले. दीपक मानकर हे देखील निवडणुकीच्या काळात जेलमधून बाहेर आले आणि थेट प्रचाराला लागले, ते कुणच्या आशीर्वादाने बाहेर आले? अशा गुन्हेगार लोकांचा निवडणुकीत राजकारणी फायदा करून घेतात, वापर करून घेतात. हे राजकारण आणि राजकारणी शोधायला पाहिजे. खरंच गुन्हा होता तर दुसरा एफआयआर का केले गेले? मारणे यांचे समर्थन नाही पण यात काहीतरी गौडबंगाल आहे. असा संशय ही रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. मी पुण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे आणि या सगळ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. आता ते खरंच कारवाई करतात का? का त्यांच्यावर सुद्धा कुणाचा दबाव आहे, हे पाहणे महत्वाचे असल्याचे ही धंगेकर म्हणाले.
पेरले तेच उगवले..! रवींद्र धंगेकरांनी सोशल मिडिया पोस्ट चर्चेत
पेरले तेच उगवले..!
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) February 22, 2025
जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर…
"पेरले तेच उगवले..! जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं. या गुंडांच्या टोळ्या आपणच पोसलेल्या आहेत. आपणच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्यापासून तर पैसे वाटप करण्यापर्यंत या टोळ्यांचा वापर केला.आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत.फरक फक्त इतकाच आहे की, आज ते तुमच्या ऑफिस पर्यंत पोहचलेत म्हणून आपण जागे झालात", अशा शब्दात धंगेकरांनी मोहोळ यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.
जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वत:च्या ऑफिस मधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं. या गुंडांच्या टोळ्या आपणच पोसलेल्या आहेत. आपणच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्यापासून तर पैसे वाटप करण्यापर्यंत या टोळ्यांचा वापर केला.आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत.फरक फक्त इतकाच आहे की, आज ते तुमच्या ऑफिस पर्यंत पोहचलेत म्हणून आपण जागे झालात.
हे ही वाचा
























