एक्स्प्लोर
Crime News: लग्नात नाचणाऱ्या महिलांचेही व्हिडीओ विकले, प्रीमिअम क्लिपची किंमत 2000 रुपये; लातूरमधील प्रज्वल तेलीबाबत धक्कादायक माहिती समोर
Mahakumbh Women Video: सांगलीतील प्राज पाटीलसह लातूरमधील प्रज्वल तेली आणि प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Mahakumbh Video Viral
1/10

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून ते डार्क वेबवर विकल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2/10

महिला रुग्णालयातील महिलांचे व्हिडिओ सीसीटीव्हीच्या माध्यमातून लीक करुन समाज माध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
3/10

सदर तीन आरोपींपैकी दोघं महाराष्ट्रातील लातूर आणि सांगलीमधील आहे.
4/10

सांगलीतील प्राज पाटीलसह लातूरमधील प्रज्वल तेली आणि प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
5/10

लातूरमधील प्रज्वल तेली परदेशातील हॅकर्सच्या संपर्कात होता. जवळपास त्याने 2000 पेक्षा जास्त व्हिडीओ रेकॉर्ड केले होते.
6/10

रुग्णालयातील प्रसुती कक्षेतील सीसीटीव्ही देखील हॅकिंग करुन व्हिडीओ विकल्याची माहिती समोर आली. तसेच लग्नात नाचणाऱ्या महिलांचे व्हिडीओ देखील डार्कवेबवर विकण्यात आले.
7/10

सदर आरोपींनी प्रीमियम व्हिडीओचे त्याने ग्रुप तयार केले.
8/10

एका व्हिडीओची किंमतही 500 रुपये इतकी ठेवली होती. तसेच प्रीमियम व्हिडीओ 2000 रुपयांना विकले.
9/10

प्रज्वल तेली हा मूळचा सांगली जिल्ह्यातील जत येथील आहे. प्रज्ज्वल हा नीट परिक्षेच्या तयारीसाठी लातुरात आला होता. या परिक्षेची तयारी करीत असताना मित्राच्या संगतीने बेकायदेशीर व्हिडीओ चोरत होता.
10/10

80 हून अधिक व्हिडीओ हे युट्यूबरवर अपलोड केले होते. त्याबदल्यात प्रज्वल तेली चांगले पैसेही कमावत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Published at : 23 Feb 2025 11:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
