Gondia Crime News : शिक्षकाने सहकारी शिक्षकाच्या पत्नीचाच केला विनयभंग! गोंदियातील शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना
Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्याचा देवरी शहरातील एका विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्याचा देवरी शहरातील एका विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी शिक्षक याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत. तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग (Crime News) केल्याची घटना घडली. याविषयी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक 53/25 भारतीय न्याय संहिता 75 (2) 79 या कलमांतर्गत आरोपी शिक्षक याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, सदर महिलाही अनुसूचित जातीचे असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलम वाढ करून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहे.
चोरीच्या 50 दुचाकींसह तिघांना अटक, नागपूर पोलिसांची तुमसरात कारवाई
उपराजधानी नागपूर शहरातील मेट्रो, रेल्वे स्थानक, बस स्थानक, मार्केट परिसर आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरून त्या भंडाऱ्यात मॉडिफाय करून तुमसर तालुक्यात अत्यंत अल्प दरात विकणाऱ्या टोळीच्या नागपूर क्राइम ब्रांच नं फांडाफोड करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरीच्या 50 पेक्षा अधिक दुचाकींसह तिघांना नागपूर क्राइम ब्रांचनं तुमसर पोलिसांच्या मदतीनं भंडाऱ्याच्या तुमसरातून ताब्यात घेतलं आहे. नागपुरातून चोरी केलेल्या दुचाकी तुमसरात आणून एका मेकॅनिकलच्या माध्यमातून गाडीचा रंग, नंबर प्लेट बदलवून आणि चेसिसची खोडतोड करून बनावट नंबरवर ती वाहनं कमी किमतीत विकण्याचा गोरखधंदा या टोळीनं केला. तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील आकाश खोब्रागडे (३२) हा या दुचाकी चोरीच्या टोळीचा मुख्य मोरक्या आहे. यासह अन्य दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नागपूर क्राइम ब्रांच नं चोरीच्या घटनेबाबत सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात आकाश हा आढळून आल्यानं मागील काही दिवसांपासून नागपूर क्राइम ब्रांच त्याच्या मागावर होता. दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता ही पोलिसांनी वर्तवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

