एक्स्प्लोर

तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!

मुंबईतील वडाळा या भागात गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे चेंडू जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई : सध्या राज्यात निवडणुकीचं वातावरण आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे अनेक कामं ही नियमांना लक्षात घेऊनच करावे लागत आहेत. असे असले तरी महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांनी कोट्यवधीची रक्कम जप्त केली आहे. असे असतानाच आता मुंबईतील वडाळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका इलेक्ट्रिशियनकडे तब्बल 1 कोटी 11 लाख रुपये किमतीचे सोन्याचे चेंडू सापडले आहेत. पोलिसांकडून याबाबत तपास केला जातोय.

नेमका प्रकार काय आहे? 

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (7 नोव्हेंबर) रात्री एका इलेक्ट्रिशियनकडून तब्बल 1 कोटी 11 लाख किमतीचे सोन्याचे पावडर असलेले चेंडू जप्त करण्यात आले. हा इलेक्ट्रिशियन मूळचा चेन्नईचा असल्याचे समोर आले असून त्याचे नाव अब्दुलकर अब्दुल मजीद असे आहे.  त्याने डोंगरी येथे राहणाऱ्या शकील नावाच्या एका व्यक्तीकडून हे सोन्याचे चेंडू घेतले होते. हे चेंडू मजीद याला अंधेरीतील एका व्यक्तीकडे सोपवायचे होते. मात्र ही डील होण्याआधीच पोलिसांनी या इलेक्ट्रिशीयनला अटक केली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. 

1 कोटी 11 लाख रुपयांचे सोने

मिळालेल्या  माहितीनुसार गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वडाळा परिसरात अब्दुल मजीद याच्या काही संशयास्पद हालचाली दिसू लागल्या. पोलिसांनी त्याला हेरलं. त्यानंतर त्याची चौकशी केली. झडती करत असताना पोलिसांना त्याच्याकडे 1 कोटी 11 लाख रुपयांचे एकूण 1457.24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चेंडू सापडले. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्याजवळ असलेल्या सोन्याचे बील त्याला विचारण्यात आले. मात्र आरोपी अब्दुल मजीद त्याच्याजवळ असलेल्या कोणत्याही सोन्याचे बील देऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेले सर्व चेंडू हे प्लास्टिक टेपने गुंडाळलेले होते. 

सोन्याची डील नेमकी कशी होती?

आरोपी अब्दुल याची पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार हे सोने शकील नावाच्या व्यक्तीचे आहे. तो चेन्नई येथून डोंगरीतील दर्गा या भागात होता. तो याच भागातील एका हॉटेलमध्ये थांबला. त्यानंतर अब्दुल याच्या चुलत भावाने हे चेंडू शकीलकडून घेऊन अंधेरीतील  एका व्यक्तीकडे सोपवण्याची जबाबदारी दिली. मात्र ही डील पूर्ण होण्याआधीच बिंग फुटले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हेही वाचा :

Akola Crime News: घरगुती खानावळच्या नावाखाली नको ते कृत्य; स्थानिकांनी महिलांसह पुरुषांना घरात कोंडलं, अन् पुढे....

Pimpri Crime: पिंपरीतील रुग्णालयात बॉम्ब असल्याचा मेल, परीसरात गोंधळाचं वातावरण, पोलिस, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Embed widget