एक्स्प्लोर

काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या दुकानात ऑक्टोंबर 2023 मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या हजरत बाबा यांच्याशी ओळख झाली.

ठाणे : अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला तरीसुद्धा आजही भोंदू बाबांकडून (Bhondu baba) भोळ्या भाबड्या नागरिकांची फसवणूक करण्याचे गुन्हे समोर येत आहे.पतीच्या आजारपण तसेच मुलावरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे, असे सांगून महिलेकडून 8 लाख 87 हजार उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. नुसरा अख्तर अलीम अन्सारी (46 वर्षे) रा. मिल्लतनगर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे गुन्हा (Crime News) दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला यांचे पती अख्तर हे आजारी असल्याने त्यांनी उपचार करून ही सुधारणा होत नसल्याने आजार बरा करण्याच्या उद्देशाने महिलेंनं भोंदू बाबाकडे धाव घेतली. त्यावेळी, भोंदू बाबाकडून 8 लाख 87 हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या दुकानात ऑक्टोंबर 2023 मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या हजरत बाबा यांच्याशी ओळख झाली. त्याने चिंताग्रस्त पतीसोबत बोलताना तुमच्यावर काळी जादू झाली असल्याचे सांगितले. तसेच, मुलावर कोणीतरी काळी जादू केली असून मुलावरील काळी जादू न उतरवल्यास 6 महिन्यात तो जीव गमावून बसेल, अशी भीती दाखवत ही काळी जादू संपवण्यासाठी कब्रस्तानातील मृतदेह आणावा लागेल. त्यातून पती व मुलावरील त्रास संपेल तसेच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारून दुकान सुद्धा चांगले चालेल, असे सांगितले. पीडित महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर घरात केलेल्या पुजे दरम्यान अंड्या मधून खिळा काढून दाखवला. त्यानंतर चांदवड मालेगाव येथे मृतदेह मिळणार असल्याचे सांगत पीडित कुटुंबीयांना बाबा चांदवड मालेगाव येथे घेऊन गेले.

तेथील बाबाच्या साथीदाराने 10 लाख रुपयांत मृतदेह मिळेल असे सांगितल्यानंतर हजरत बाबा याने घासाघीस करून आठ लाख रुपयांत सौदा पक्का केला. परंतु त्यानंतर भोंदू बाबाने कोणताही मृतदेह न आणता एका बॉक्स मध्ये खोटा मृतदेह आणून तो गैबी नगरमधील इमारतीमध्ये ठेवला असल्याचे सांगितले. पैसे घेताना पीडित कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी महिलेला एका मृतदेहाचा फोटो मोबाईलवर पाठवून दिला. दरम्यान, यामुळे पीडित कुटुंबीय कर्जबाजारी झाले असताना याच भोंदू बाबाने या पीडित कुटुंबीयाला खासगी सावकाराकडून महिना नऊ टक्के व्याजाने तीन लाख रुपये कर्जाने मिळवून दिले. परंतु, त्यानंतर भोंदू बाबाने कोणतेही काम न करता फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने पीडित महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला.

अनिसमुळे पोलिसांची चक्रे फिरली, गुन्हा दाखल

अनिसने दिलेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्ष वंदना शिंदे यांच्याकडे पीडित महिलेने आपली कैफियत मांडली. त्यांनी सदरची घटना पोलीस आयुक्त यांना सांगताच पोलिस प्रशासनाची चक्रे वेगाने फिरली. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात हजरत बाबा उर्फ अमजद असद खान या विरोधात  भा.न्याय संहिता कलम ३१८(४),३१६ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि इत्तर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिबंध घालण्या साठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्या बाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(१) ३(२) अन्वये गुन्हा दाखल भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.त्याने अशाच पद्धतीने कोणाला फसवले आहे का याचा सुध्दा शोध पोलिस घेत आहेत अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Dance Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचं लग्न, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स
Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
Home Rent Rules : भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget