
Salary Hike In 2023: जागतिक मंदीच्या तोंडावर नोकरदारांसाठी गोड बातमी, यंदा पगारात होणार घसघशीत वाढ
Salary Hike In 2023: यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊ नये यासठी ही वाढ करण्यात येत आहे. कुशल कर्मचारी रोखण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

Salary Hike In 2023: जगात महामंदी (Recession) येणार अशी चर्चा सुरु झाली. मंदीच्या गर्तेत काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी एक खुशखबर आहे. या वर्षी त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार 2023 मध्ये कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.8 टक्क्यांनी वाढ करु शकतात. जागतिक मंदीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.
जागतिक मंदीच्या तोंडावर भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 2022 पेक्षा जास्त वाढ (Salary Hike In 2022) करण्याच्या तयारीत आहे. कॉर्न फेरी या संस्थेने केलेल्य अभ्यासात ही माहिती समोर आहे. 2022 साली कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.2 टक्के वाढ झाली होती. परंतु 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारत 9.8 टक्क्यांनी (Salary Hike In 2023) वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्या कर्मचााऱ्यांच्या पगारात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र यंदाची वाढ आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठी असणार आहे.
कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त पगारवाढ?
कॉर्न फेरीने (Korn Ferry) केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, "सध्या कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची संख्या कमी आहे. जे कर्मचारी हुशार आहेत, आपली कामे चोख करतात अशा कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाऊ नये यासठी ही वाढ करण्यात येत आहे. कुशल कर्मचारी रोखण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. हा अभ्यास 818 कंपन्यांमध्ये करण्यात आला आहे. या अभ्यासानंतर 2023 मध्ये सरासरी पगारात 9.8 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवांमध्ये सरासरी 10.2 टक्के आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात 10.4 टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य सेवांमध्ये 9.8 टक्के, ऑटोमोटिव्हमध्ये 9 टक्के, केमिकल्समध्ये 9.6 टक्के आणि रिटेलमध्ये 9 टक्के सरासरी पगारवाढ अपेक्षित आहे."
Korn Ferry चे नवनीत सिंह म्हणाले की, "जगात महामंदी येणार अशी चर्चा सुरु झाली. अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचा ट्रेण्ड सुरु आहे. भारताचा जीडीपी 6 टक्क्यांच्यावर असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कुशल कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अभ्यासानुसार, मॅक्रोइकॉनॉमिक आऊटलूक सकारात्मक आहे. परंतु सतत बदलत असलेल्या ग्राहकांच्या पसंती, डिजिटल परिवर्तन, वाढता सहभाग, व्यवसायावर नवीन प्रकारचे दबाव वाढत आहेत. त्यामुळे अभ्यासात 60 टक्के कंपन्यांनी हायब्रिड मॉडेलचा अवलंब केल्याचे सांगितले आहे.
जानेवारीत गेला तब्बल 24 हजारांचा रोजगार
2023 च्या सुरुवातीला आयटी क्षेत्रातल्या अनेकांचा रोजगार गेला आहे. गेल्या वर्षाच्या शेवटीच जगात जागतिक मंदीचा अंदाज वर्तवला जात होता आणि अगदी तशीच सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांची आकडेवारी पाहिली तर तब्बल 24 हजार 151 आयटी कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Layoffs in January : जानेवारीतही नोकरकपातीचा ट्रेण्ड, 15 दिवसांत गेला तब्बल 24 हजारांचा रोजगार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
