ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
रघुपति राघव राज राम भजन गायल्याने भजन गायिका देवी यांना माफी सुद्धा मागावी लागली. जय श्री रामचा नारा द्यावा लागला, त्यानंतरच प्रकरण शांत झाले आणि कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.
पाटणा : बिहारमधील पाटणा येथे गुरुवारी अटल जयंती सोहळ्यात महात्मा गांधींचे भजन रघुपति राघव राज रामवरून गदारोळ झाल्याची धक्कादायक घटन घडली आहे. रघुपति राघव राज राम भजन गायल्याने भजन गायिका देवी यांना माफी सुद्धा मागावी लागली. जय श्री रामचा नारा द्यावा लागला, त्यानंतरच प्रकरण शांत झाले आणि कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, डॉ. सीपी ठाकूर, शाहनवाज हुसेन, दरभंगाचे खासदार गोपालजी ठाकूर, भाजप नेते संजय पासवान आदी उपस्थित होते.
दुसरीकडे राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी या घटनेवर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, जेव्हा नितीश कुमार यांच्या भाजप सहकाऱ्यांनी गांधीजींचे भजन गायले तेव्हा त्यांनी गोंधळ घातला. कमी समज असलेल्या लोकांच्या भावना दुखावल्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अश्विन चौबे यांनी 25 डिसेंबर रोजी पाटणा येथील बापू सभागृहात 'मैं अटल राहूंगा' कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गायिका देवी यांनी 'ईश्वर-अल्ला तेरो नाम' गाताच लोक संतापले
या कार्यक्रमात गायिका देवी यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात देवी यांनी 'भारत माता की जय' आणि 'अटल बिहारी वाजपेयी अमर रहे'च्या घोषणा दिल्या. यानंतर त्यांनी रघुपती राघव राजा रामचा गायले. देवी यांनी ‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ या भजनाची ओळ गायली तेव्हा सभागृहात उपस्थित सुमारे 60-70 युवा कार्यकर्ते संतापले. यानंतर सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहिले आणि ‘जय श्री राम’चा जयघोष करू लागले. यावर गायिका देवी म्हणाल्या की, देव आपल्या सर्वांचा आहे आणि तिचा उद्देश फक्त रामाचे स्मरण हाच होता. मात्र, त्याचा काहीही परिणाम होत नसताना आयोजकांनी हस्तक्षेप केला. आयोजकांच्या मध्यस्थीनंतरही काही निष्पन्न झाले नाही, तेव्हा देवी म्हणाल्या, 'देव आपल्या सर्वांचा आहे.' तुमचे मन दुखावले असेल तर मला माफ करा.
यानंतरही लोकांचे समाधान झाले नाही आणि घोषणाबाजी करत बाहेर पडू लागले. यावर देवींना ‘जय श्री राम’चा नाराही द्यावा लावला. तेव्हा आयोजकांनी मंचावरून सांगितले की, आम्ही सर्व भारतमातेची लेकरे आहोत. आपण आपला परिचय असा देत नाही.
विरोध करणाऱ्यांनी आपली संकूचित विचारसरणी दाखवून दिली
वादानंतर, गायिका देवी यांनी सांगितले की, हा वाद अनपेक्षित होता. हे गांधीजींचे आवडते भजन आहे. सन्मानानंतर सर्वांना गाणे म्हणण्यास सांगितले. या वादानंतर मंचावर उपस्थित असलेल्या लोकांनाही समजू शकले नाही की काय चालले आहे. नंतर त्यांना अल्लाहच्या नावाने राग आल्याचे समोर आले. तर शहनाबाज हुसैनही मंचावर उपस्थित होते. यात वादाचा मुद्दा नव्हता. मी जे काही बोललो त्याबद्दल कोणाला वाईट वाटले नाही असे मला वाटले. म्हणूनच मी माफीही मागितली. या गाण्यावरून वाद होऊ शकतो हे मला समजले नाही. माफी मागण्याचा दबाव नव्हता. आयोजक भाजप नेते अश्विन चौबेही घाबरले होते. विरोध करणाऱ्यांनी आपली छोटी विचारसरणी दाखवून दिली असल्याचे देवी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या