एक्स्प्लोर

Zero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?

Zero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?
बदलापुरातल्या एका नामांकित शैक्षणिक संस्थेत दोन अल्पवयीन मुलींच्या झालेल्या लैंगिक शोषणाची घटना ताजी असतानाच, नजिकच्या कल्याण शहरात तुम्हाआम्हाला हादरवून सोडणारी एक घटना घडली आहे.  विशाल गवळी नावाच्या एका नराधमानं कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशालला त्याच्या पत्नीनंच मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळं पोलिसांनी विशालसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. त्या दोेघांनाही दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.   पुण्याजवळच्या राजगुरुनगरमध्ये शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्यानं दोन चिमुकल्या मुलींची हत्या केली. त्या दोन मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून हा नराधम त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. तो एका मुलीवर अत्याचार करताना तिनं प्रतिकार केला. ओरडायला सुरुवात केली. त्यामुळं तो नराधम आचारी घाबरला आणि त्यानं तिची हत्या केली. हा सारा प्रकार दुसऱ्या चिमुकलीनं पाहिला. ती सर्वांना सांगेल या भीतीनं त्यानं तिचाही जीव घेतला.   काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात आठ तास रेल रोको करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील एका नामांकित शाळेत एका शिक्षकानं चिमुकल्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले.   या साऱ्या घटना मन सुन्न करून टाकत असतानाच थरकाप उडवणारी आणखी घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली. दहा दिवसांपूर्वीच्या या घटनेत एका नऊ वर्षांच्या मुलानं तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. या सगळ्या घटना ऐकल्या तुमची आमची अवस्था काही सुचेनासं होणारी होती. एक माणूस म्हणून आपण कुठे चाललोय, असा प्रश्न पडतो.  आज आपल्या अनेकांच्या घरात मुली आहेत. कुणाच्या मुली अगदी लहान आहेत, कुणाच्या मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेत, कुणाच्या मुली लग्न होऊन नुकत्याच आपल्या सासरीही गेल्या आहेत. पण मुलगी चिमुरडी असो किंवा सज्ञान, ती कुठेच सुरक्षित नाही, असं का झालंय? घर, शाळा, कॉलेज, ऑफिस, ट्रेन, टॅक्सी, फुटपाथ, हॉटेल, सिनेमा थिएटर... यापैकी कुठली जागा उरलीय, जिथे मुलींवर अत्याचार होत नाहीयत?   आणि गेल्या काही वर्षांत तर मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. बेटी बचाओ, बेटी पढाओ असं आपल्या केंद्र सरकारचं धोरण आहे. पण आता त्याच लेकींना समाजातल्या विकृत नजरांपासून वाचवण्याची वेळ आलीय. असं का घडतंय? चिमुरड्या मुलींवर, महिलांवर अत्याचार करणारे विकृत पुरुष नेमका काय विचार डोक्यात ठेवून कुठे कुठे दबा धरून बसलेयत? कितीही ठेचलं तरी समाजात ही विकृती पुन्हा पुन्हा का उत्पन्न होते? या विकृत पुरुषांच्या घरात किंवा त्यांच्या आयुष्यात आई, बहीण, पत्नी, वहिनी आणि स्वतःची मुलगी अशी नाती नाहीचयत का? 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?
Zero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाईAnjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget