एक्स्प्लोर

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन (Dr Manmohan Singh passes Away) यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होतोय.  

Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन (Dr Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन वेळाचे देशाचे पंतप्रधान होते. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात आहेत.  डॉ. मनमोहन सिंह  यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब विद्यापीठातून घेतले. येथून त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले,तिथे त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून डॉ. फिलची पदवीही मिळवली.

डॉ. मनमोहन सिंह यांची राजकीय कारकिर्द

डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे चौदावे पंतप्रधान झाले होते.  डॉ. मनमोहन सिंह हे नम्रता, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी यासाठी ओळखले जातात. मनमोहन सिंह 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले होते. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. ते अर्थ मंत्रालयाचे सचिव तसेच नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मनमोहन सिंह 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा होता. ते 2004 साली भारताचे पंतप्रदान झाले. त्यानंतर 2009 साली दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. ते सलग 10 वर्ष भारताचे पंतप्रधान होते. 

महत्वाच्या बातम्या:

Manmohan Singh Death: दोन वेळा भारताचे पंतप्रधान, तरीही साधी राहणी, डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे किती संपत्ती?

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget