एक्स्प्लोर

फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त

Manisha Khatri appointed as Nashik NMC Commissioner : राहुल कर्डीले यांची नाशिक मनपा आयुक्तपदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. मनीषा खत्री (Manisha Khatri) यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. 

Nashik News :  नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आयुक्तपदी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (Rahul kardile) यांची तीन दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, भाजपच्या बड्या नेत्याच्या नाराजीमुळे राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक लागल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती. आता राहुल कर्डीले यांची नाशिक महापालिका आयुक्तपदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांची मनपा आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. 

गेल्या सहा वर्षात नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नाही. त्याचा थेट परिणाम नाशिकच्या विकासावर झाल्याचे दिसून येत आहे. डॉ. अशोक करंजकर यांनीही राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेच्या कारभारातून अंग काढून घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यात दोन निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आणि पालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे कारभार पूर्णपणे भरकटला होता. त्यामुळे नाशिकसाठी आयएएस अधिकारी द्यावा, अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. 

फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली

त्यामुळे महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांच्याकडे नाशिक आयुक्तपदाची धुरा सोपवली होती. मात्र, भाजपच्या एका बड्या मंत्र्याने आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची गळ घातल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती. यामुळे नाशिक महानगर विकास प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता पदभार जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी राहुल कर्डिले यांना भोवली आहे. राहुल कर्डीले यांची नाशिक महापालिका आयुक्तपदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. राहुल कर्डिले हे मसूरी येथे ट्रेनिंगला गेलेले आहेत. मात्र या ट्रेनिंग दरम्यानच नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त

तर, एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मनपा आयुक्तपदी नियुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केले जात होते. मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्या पत्नी आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने मनीषा खत्री यांच्या नाशिक महानगरपालिका आयुक्त पदाचे निर्देश दिले आहेत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली, दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना

Manikrao Kokate : 28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Embed widget