दिलासादायक! 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढणार, किती राहणार GDP? संयुक्त राष्ट्राचा अहवाल
2024 मध्येही भारतीय अर्थव्यवस्था (India Economy) जगातील सर्वात वेगाने वाढेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रानं (UN) व्यक्त केला आहे.
GDP Of India : 2024 मध्येही भारतीय अर्थव्यवस्था (India Economy) जगातील सर्वात वेगाने वाढेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रानं (UN) व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, 2024 मध्ये भारताचा विकास दर 6.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मजबूत देशांतर्गत मागणी तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील मजबूत वाढ या वाढीचा अंदाज साध्य करण्यात मदत करेल. 2025 या वर्षातही तो विकासदर कायम राहील असंही संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
2025 मध्ये जीडीपी 6.6 टक्के राहण्याचा अंदाज
UN वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट (WESP) 2024 अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील वेगवान वाढीमुळं, दक्षिण आशियातील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2024 मध्ये 5.2 टक्के दराने वाढ दर्शवेल. . यूएनने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होत आहे. अहवालानुसार, भारताचा GDP 2024 मध्ये 6.2 टक्के असण्याचा अंदाज आहे, जो 2023 च्या अंदाजापेक्षा थोडा कमी आहे. UN ने 2023 मध्ये GDP 6.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. पण अहवालानुसार 2025 मध्ये जीडीपी 6.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने 6 टक्क्यांच्या वर
ग्लोबल इकॉनॉमिक डिव्हिजन मॉनिटरिंग ब्रँच, इकॉनॉमिक अॅनालिसिस अँड पॉलिसी डिव्हिजन (UN DESA) चे प्रमुख हमीद रशीद म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेने या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे. आमचा अंदाज आहे की 2024 आणि 2025 मध्येही तो कायम राहील. भारतात महागाई जास्त आहे, तरीही भारताला व्याजदर जास्त वाढवण्याची गरज नाही आणि महागाईचा दर खाली आला असल्याचे हमीद रशीद म्हणाले.
दरम्यान, 5 जानेवारी 2024 रोजी सांख्यिकी विभाग 2023-24 साठी GDP वाढीचा अंदाज जाहीर करेल. असे मानले जाते की चालू आर्थिक वर्षात सरकार जीडीपी अंदाजे 7 टक्के असेल. डिसेंबर 2023 मध्ये चलनविषयक धोरण जाहीर करताना, रिझर्व्ह बँकेने 2023 ते 24 साठी GDP 7 टक्के राहण्याचा अंदाजही वर्तवला आहे.
सर्व जागतिक आव्हानांमध्ये भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) सध्या झपाट्याने वाढत आहे. जग विक्रमी चलनवाढ, भू-राजकीय तणाव आणि पुरवठा साखळी अशा विविध आव्हानांचा सामना करत आहे. अशात भारताची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळू शकतो, असा विश्वास जागतिक गुंतवणूक बँकिंग फर्म नोमुराने (Nomura) व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
2024 मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहणार का? भारतीय अर्थव्यस्थेला पाठिंबा मिळणार का?