पाकिस्तानात 24 तासात 18 सैनिकांसह 42 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला; नेमकं काय घडतंय?
बलुचिस्तानमधील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांना स्वतंत्र देश म्हणून जगायचे होते. पण त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला.

18 Pakistani soldiers killed : पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 पाकिस्तानी सैनिक (Pakistani soldiers) ठार झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिक कलात जिल्ह्यात फुटीरतावाद्यांविरोधात कारवाई करणार होते. दरम्यान, 70 ते 80 बंडखोरांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला.या चकमकीत 12 दहशतवादीही मारले गेल्याचे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी सांगत आहेत. दहशतवाद्यांविरोधातील त्यांची कारवाई सुरूच राहणार असून या घटनेतील दोषींना अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, असे लष्कराने म्हटले आहे.
गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण 23 दहशतवादी ठार
डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैनिक बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फुटीरतावाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. बलुचिस्तानमध्ये गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण 23 दहशतवादी ठार झाले आहेत. वृत्तानुसार या हल्ल्यासाठी बलुच लिबरेशन आर्मीला जबाबदार धरले जात आहे. मात्र, बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
18 Pakistani soldiers who were killed by Baloch rebels in Kalat of Balochistan. https://t.co/cj3soxm3Fr pic.twitter.com/JqvLMqCkzZ
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 1, 2025
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे काय?
बलुचिस्तानमधील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांना स्वतंत्र देश म्हणून जगायचे होते. पण त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला. तसे झाले नाही, त्यामुळे बलुचिस्तानमध्ये लष्कर आणि जनता यांच्यातील संघर्ष आजही सुरू आहे. बीबीसीच्या मते, बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या अनेक संघटना आहेत पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ही सर्वात शक्तिशाली संघटना आहे. ही संघटना 70 च्या दशकात अस्तित्वात आली पण 21 व्या शतकात तिचा प्रभाव वाढला आहे.
बीएलएला पाकिस्तान सरकार आणि चीनपासून बलुचिस्तान मुक्त करायचा आहे. बलुचिस्तानच्या साधनसंपत्तीवर त्यांचा हक्क आहे, असा त्यांचा विश्वास आहे. पाकिस्तान सरकारने 2007 मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला होता.
बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील बलूच बंडखोर आणि खैबर पख्तूनख्वामध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) लढवय्यांशी लढत आहे. प्रतिबंधित पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) गट यांच्यातील युद्धविराम करार नोव्हेंबर 2022 मध्ये मोडला गेला. तेव्हापासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पाकिस्तानी लष्करासाठी गेल्या दशकातील हे सर्वात घातक वर्ष
डॉनच्या रिपोर्टनुसार, 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये एकूण 444 दहशतवादी हल्ले झाले. यामध्ये 685 जवानांना प्राण गमवावे लागले. पाकिस्तानी लष्करासाठी गेल्या दशकातील हे सर्वात घातक वर्ष ठरले. दहशतवादी हल्ल्यात 1,612 लोकांचाही मृत्यू झाला होता. हे 2023 पेक्षा 63 टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी 934 दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये दररोज सरासरी 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 9 वर्षांतील हा उच्चांक आहे.
पाकिस्तान सरकार टीटीपीवर नियंत्रण ठेवू शकत नाही
टीटीपीला रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेक उपाययोजना केल्या. आधी दहशतवादी संघटनेशी बोलणी करून युद्धविराम प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले. यात यश न आल्याने अफगाणिस्तान सरकारवर दहशतवाद्यांना पाठिंबा देऊ नये यासाठी दबाव आणण्यात आला, तरीही त्याचाही उपयोग झाला नाही. यानंतर पाकिस्तानने नोव्हेंबर 2023 मध्ये 5 लाखाहून अधिक अफगाण शरणार्थींना बाहेर काढले पण त्याचा फारसा फायदा झाला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
