Gulabrao Patil : धर्मासोबत राहणारा जिवंत राहील, विरोधात जाणाऱ्यांचं काही खरं नाही, गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, भगव्या झेंड्यामुळेच...
Gulabrao Patil : आपण कुठल्या जातीचे आहोत. यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकला नाही तर जात कशी टिकेल? असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

Gulabrao Patil : आपण कुठल्या जातीचे आहोत. यापेक्षा हिंदू (Hindu) धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कशी टिकेल? सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. तर भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होवू शकलो, याचा मला अभिमान असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, इतका चांगलं देवस्थान आपल्या या भागामध्ये आहे. मागच्या काळात या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. सध्या जो धर्माबरोबर राहील तो जिवंत राहील. धर्माच्या विरुद्ध राहील त्याचे काही खरं नाही. त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी म्हटले.
हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत आणि मग इतर जातीचे आहोत. हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल. हिंदू धर्म टिकणार नाही तर जात कुठून टिकणार? त्यामुळे धर्म सेवा सुरू आहे. या धर्मसेवेला आपण सगळे मदत करत राहतो. पुढच्या काळातही आम्ही येथे मदत करण्याचा प्रयत्न करू. कारण या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचा मला अभिमान आहे.
मंत्री जरी असलो तरी पहिले मी हिंदू
निवडणूक पाहिली तर भगवे एका साईडला होते आणि बाकीचे सर्व एका साईडला होते. त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, या निवडणुकीत आपल्याला किती मेहनत करावी लागली. मी मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू आहे. त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणे अभिमान आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणे हे काही चुकीचे नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
