Washim Crime : 50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार
Washim Crime : 50 वर्षीय दिव्यांग नराधमाने 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीये.

Washim Crime : वाशिममध्ये (Washim Crime) 50 वर्षीय दिव्यांग नराधमाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून भररस्त्यात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीये. वाशिमच्या मंगरूळपीर शहरात ही घटना घडलीये. या प्रकरणी 50 वर्षीय दिव्यांग व्यक्तीवर गुन्हा दाखल (Washim Crime) करण्यात आलाय. पीडित चिमुकलीच्या पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलीये.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांत गुन्हा दाखल
अधिकची माहिती अशी की, आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी 50 वर्षीय दिव्यांग नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाशिमच्या मंगरूळपीर शहरात आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. दरम्यान, पीडित मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केलीये. या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
आठ वर्षीय चिमुकली शाळेतून घरी परत येत असताना एका 50 वर्षीय दिव्यांग आरोपीने मुलीला रस्त्यावर थांबवून चॉकलेटचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने भररस्त्यात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर बीएनएस कलम 376 सह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास मंगरूळपीर पोलिसांकडून सुरु आहे..
नालासोपाऱ्यात 15 वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार
नालासोपारा परिसरात राहणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. दरम्यान, नराधमांनी अत्याचार केल्यानंतर व्हिडीओ शूट करत संबंधित पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केलीये. ही घटना 17 जानेवारी रोजी घडलीये. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून 4 जणांना अटक करण्यात आलीये. याप्रकरणी चौघांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिकची माहिती अशी की, पीडित मुलगी नालासोपारा पूर्वेला राहते. तिच्या परिसरातीलच अयान नावाच्या मुलाने तिला चांद पठाण या आरोपीच्या घरी नेले. तेथे अयान आणि चांद यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर चांद पठाण आणि अमीर अन्सारी यांनी तिच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या आणि जर ही घटना कोणाला सांगितली तर तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केला जाईल, अशी धमकीही तिला देण्यात आली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
