एक्स्प्लोर
PM Kisan : पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची येत्या वर्षातील 6000 रुपयांची चिंता मिटली, सरकारनं अर्थसंकल्पात केली मोठी तरतूद
PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली. शेती क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या.

पीएम किसान योजना
1/5

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सहा नव्या योजना निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या. देशातील 100 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे.
2/5

निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्डची पत मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांवर नेली आहे. याचा लाभ 7.7 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
3/5

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कापूस उत्पादकता मिशन जाहीर केलं आहे.तर, सिंचनाच्या व्यवस्थेला बळ देण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबवण्याची घोषणा केली आहे. 8260 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
4/5

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेसाठी केंद्र सरकारनं 63500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
5/5

याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजना 8500 कोटी, कृषी उन्नती योजना 8000 कोटी रुपयांसह विविध योजनांसाठी तरतुदी केल्या आहेत.
Published at : 02 Feb 2025 01:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion