एक्स्प्लोर

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? 5 लाख रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी कसा कराल अर्ज? 

Kisan Credit Card Budget 2025-26 : किसान क्रेडिट कार्डची (Kisan Credit Card) मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

Kisan Credit Card Budget 2025-26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची (Kisan Credit Card) मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. शेतकरी आता 1 एप्रिल 2025 पासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करु शकतील. याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

शेतकऱ्यांना कमी व्याजदरात मिळते कर्ज

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये शेतीसाठी देखील अनेक नवीन घोषणा केल्या आहेत. यातीलच एक घोषणा म्हणजे किसान क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी त्यांच्या गरजेनुसार कर्ज दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते. जेणेकरुन त्यांच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण होतात. त्याच वेळी, कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास, सरकार व्याजावर 3 टक्के सूट देते, ज्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो.

किसान क्रेडिट कार्डची रक्कम शेतीसाठी दिली जाते

KCC शी लिंक केलेल्या RuPay कार्डद्वारे, शेतकरी ATM मधून पैसे काढू शकतात आणि डिजिटल पेमेंट देखील करु शकतात. याशिवाय KCC धारक शेतकऱ्यांची पिके प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत समाविष्ट केली जाऊ शकतात. केसीसी रक्कम शेतीसाठी दिली जाते. अशा परिस्थितीत शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि डीएपी शेतीसाठी खरेदी करण्यासाठी KCC मर्यादेचा वापर करू शकतात.

किसान क्रेडिट कार्डसाठी कसा कराल अर्ज?

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करू शकता. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कोणत्याही बँक, लघु वित्त बँक आणि सहकारी मध्ये केला जाऊ शकतो.

किसान क्रेडिट  कार्डचे फायदे काय? 

किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. आता 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते. म्हणजे जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडत असेल तर त्याला 3 टक्के अनुदान मिळते.

किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते? 

किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना अर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते. मात्र योजनेमध्ये कमाल वयाची मर्यादा नाही. आता सरकार या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज पाच वर्षांपर्यंत घेता येते. किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील पाच वर्षांपर्यंत आहे.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल असणे आवश्यक आहे. याशिवाय, जमिनीच्या मालकीचा/भाडेकराराचा पुरावा हा शेतकऱ्याच्या नावावरील जमीन अभिलेख असावा (खतौनी, जमाबंदी, पट्टा इ.), शेतकरी भाडेकरु असल्यास भाडेकराराची वैध कागदपत्रे असावीत. हे सुरक्षित कर्ज असल्याने, शेतकऱ्यांना कर्जाच्या रकमेइतकेच तारण आवश्यक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगीAmbadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरणAnil Parab News | समज देण्याचा अधिकार सभापतीना, इतरांना नाही..अनिल परब- राणेंमध्ये खडाजंगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
Embed widget