एक्स्प्लोर

Income Tax Calculator : नव्या टॅक्स रिजीममध्ये 10 ते 50 लाखांदरम्यान उत्पन्न, 2025-26 मध्ये किती प्राप्तिकर भरावा लागेल? 

Union Budget 2025-26 Income Tax Calculator : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये नव्या कररचनेत फेरबदल करण्यात आले आहेत.

Income Tax Calculator Budget 2025 नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)  यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 12 लाख रुपयांपर्यंचं उत्पन्न नव्या कररचनेमध्ये मुक्त करत असल्याची घोषणा केली. त्यामुळं मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.   सध्या प्राप्तिकरदात्यांना दोन पर्यांयांपैकी एका पर्यायाची निवड करावी लागते. न्यू टॅक्स रिजीमकडे जवळपास 72 टक्के करदाते वळले आहेत. तर, ओल्ड टॅक्स रिजीममध्ये 28 टक्के प्राप्तिकरदाते आहेत. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास किती कर द्यावा लागेल हे जाणून घेणार आहोत. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या कररचनेत बदल करण्याची घोषणा केली. 2024-25 च्या अर्थसंकल्पात नवीन करचनेत 0 ते 3  लाख रुपये करमुक्त होती. 2025-26 च्या अर्थसंकल्पात 0 ते 4 लाख रुपयांच्या स्लॅबमध्ये कर आकारला जाणार नाही.  आपण नव्या कररचनेत 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंत एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असल्यास त्याला किती कर द्यावा लागेल हे जाणून घेणार आहोत. 

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या बदलानुसार नव्या कररचनेची निवड केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 10 लाख रुपये असल्यास त्याला कर द्यावा लागणार नाही. 

एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 20 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 1925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 16 लाख ते 20 लाख या दरम्यानचा लागू होतो. त्याला कर 185000 रुपये आणि  शिक्षण आणि आरोग्य सेसची रक्कम 7400 एकूण 192400 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल. 

एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 30 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 2925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 24 लाख रुपयांपेक्षा अधिक असणारा लागू होईल. या स्लॅबमध्ये 30 टक्के कर भरावा लागेल. निव्वळ कर 4,57,500  शिक्षण आणि आरोग्य सेस 18,300 सह एकूण 475800 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल. 

एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 40 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 3925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 24 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणारा लागू होतो. यामध्ये 30 टक्के कर भरावा लागेल. निव्वळ कर  7,57,500 सेस शिक्षण आणि आरोग्य सेसची रक्कम 30,300 रुपये म्हणजेच एकूण 7,87,800 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल. 

एखाद्या व्यक्तीचं पगाराचं उत्पन्न 50 लाख रुपये असल्यास पगारादारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75000 वजा केल्यास करपात्र उत्पन्न 4925000 इतकं राहतं. अशा प्रकरणात इन्कम टॅक्स स्लॅब 24 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणारा लागू होतो. यामध्ये 30 टक्के कर भरावा लागेल. निव्वळ 10,57,500 रुपये  शिक्षण आणि आरोग्य सेस 42,300 रुपये मिळून एकूण 10,99,800 रुपये प्राप्तिकर भरावा लागेल. 

Income Tax Calculator : नव्या टॅक्स रिजीममध्ये 10 ते 50 लाखांदरम्यान उत्पन्न, 2025-26 मध्ये किती प्राप्तिकर भरावा लागेल? 

इतर बातम्या :

Union Budget 2025 : यंदा अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला काय मिळणार? नेमक्या अपेक्षा काय?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget