एक्स्प्लोर

Phule Movie Trailer: एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मुख्य भूमिकेत कोण झळकणार?

Phule Hindi Movie Trailer: महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. आता यांच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित 'फुले' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Phule Hindi Movie Trailer: झी स्टुडिओज् (Zee Studios) प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित 'फुले' (Phule Movie Trailer) या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे.

'फुले' : परिवर्तनाची कहाणी

महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे. महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी उभ्या केलेल्या चळवळींचा आजही आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे.                                         

दिग्दर्शक आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण

या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत 'स्कॅम 1992' फेम प्रतीक गांधी दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रं जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

उत्कृष्ट निर्मिती आणि भव्य प्रस्तुती

'फुले' चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ' फुले' हा हिंदी चित्रपट जगभर 11 एप्रिल 2025 प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kunal Kamra Controversy: कुणाल कामराने डाव टाकला, एकनाथ शिंदेंना काऊंटर करण्यासाठी अजितदादांना वादात खेचलं, म्हणाला...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

व्हिडीओ

Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Rahul Gandhi : प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
Embed widget