IPL DC vs LSG Ashutosh Sharma: कपडे धुण्यापासून ते अंपायरिंग, पडेल ते काम केलं; लखनौच्या तोंडातील विजयाचा घास हिरावणारा आशुतोष शर्मा कोण?
IPL DC vs LSG Ashutosh Sharma: यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या आशुतोष शर्माने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे.

IPL DC vs LSG Ashutosh Sharma: आयपीएल 2025 मधील (IPL 2025) आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात लखनौ सुपर जायंट्सचा (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) एक विकेट्सने पराभव केला. लखनौने दिल्लीला 210 धावांचे लक्ष्य दिले होते. जवळपास लखनौने सामना जिंकला असे वाटत असताना दिल्लीच्या आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) आणि विप्राज निगम (Vipraj Nigam) याने आक्रमक फलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. आशुतोष शर्मा आणि विप्राज निगमचे सध्या सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. दरम्यान आयपीएल 2024 च्या हंगामात देखील आशुतोष शर्माने अनेक सामन्यात कमी चेंडूत धमाकेदार खेळी करत सर्वांना आकर्षित केले होते. यानंतर यंदाच्या आयपीएल हंगामातील संघाच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या आशुतोष शर्माने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे.
And he does it in 𝙎𝙏𝙔𝙇𝙀 😎
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2025
Ashutosh Sharma, take a bow! 🙇♂️
A #TATAIPL classic in Vizag 🤌
Updates ▶ https://t.co/aHUCFODDQL#DCvLSG | @DelhiCapitals pic.twitter.com/rVAfJMqfm7
अंपायरिंग केली, इतरांचे कपडे धुतले...
आशुतोष शर्मा यांचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला. मध्य प्रदेशकडून लिस्ट-ए आणि टी-20 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने बरेच वयोगटातील क्रिकेट खेळले होते. एका वृत्तानुसार, आशुतोष शर्मा म्हणतो की तो क्रिकेट कोचिंगसाठी वयाच्या 8 व्या वर्षी इंदूर सोडले होते. आशुतोषकडे जेवायला पैसे नव्हते आणि त्याला एका लहान खोलीत राहावे लागत होते. पैसे कमवण्यासाठी त्याने पंचगिरी करायला सुरुवात केली आणि इतरांचे कपडेही धुतले. एमपीसीए अकादमीमध्ये आल्यानंतर प्रशिक्षक अमय खुरासिया यांनी आशुतोषला खूप मदत केली. सय्यद मुश्ताक अलीमध्ये तो खूप चांगली कामगिरी करत होता, पण 2020 मध्ये एमपी संघाचा प्रशिक्षक बदलण्यात आला, त्यानंतर आशुतोषसाठीही परिस्थिती बदलली. आशुतोषला एमपीच्या संघातून वगळण्यात आले, तरीही तो सातत्याने चांगली कामगिरी करत होता. अखेर 2024 मध्ये त्याला पंजाब किंग्जकडून आयपीएल करार मिळाला, गेल्या वर्षी त्याला 20 लाख रुपये देण्यात आले होते, तर यावेळी दिल्ली कॅपिटल्सने त्याला 3.8 कोटी रुपयांना खरेदी केले.
कोण आहेत आशुतोष शर्मा?
आशुतोष शर्मा यांचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला होता. तो रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. पण पूर्वी तो फक्त मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. मीडिया रिपोर्ट्सवर 2020 मध्ये मध्य प्रदेश संघ सोडावा लागला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यावर आशुतोषला राज्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यानंतर तो रेल्वे संघात सामील झाला. भारताकडून खेळलेल्या नमन ओझाने आशुतोषला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केल्याचे बोलले जाते. आशुतोष लहानपणी नमनचा चाहता होता. नमन ओझा हा देखील मध्य प्रदेशचा आहे.
11 चेंडूत झळकावलेय अर्धशतक-
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा 16 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. युवराज सिंगने 2007 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
दिल्ली आणि लखनौचा सामना कसा राहिला?
लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 209 धावांचा मोठा धावसंख्या उभारला होता. तिथे फक्त 7 धावांत 3 विकेट आणि 65 धावांत 5 विकेट गमावलेल्या दिल्लीने आशुतोष शर्माच्या बळावर जोरदार पुनरागमन केले आणि शेवटच्या षटकात फक्त 1 विकेटने सामना जिंकला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने केलेला हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.





















