Satara Bear attack: मोबाईलवर 5G नेटवर्क शोधत आजोबा जंगलात शिरले, कोअर झोनमध्ये पाय ठेवताच अस्वलाचा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत
Satara Bear attack : कोयना विभागातील अतिदुर्गम व चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमधील कोळणे गावात एका वृध्दावर अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे.

Satara Bear attack : कोयना विभागातील अतिदुर्गम व चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमधील कोळणे गावात एका वृध्दावर अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्याच्यांवर सध्या कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अर्जुन मानू डांगरे (वय 80) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. सध्या सर्वत्र 5G नेटवर्क मिळत असताना पाटण तालुक्यात नेटवर्क मिळत नसल्याने रेंजच्या शोधात असलेल्या वृध्दावर या अस्वलाने जीवघेणा हल्ला केल्याची माहितीपुढे आली आहे.
कोअर झोनमध्ये पाय ठेवताच अस्वलाचा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत
दरम्यान, वन्यप्राण्यांच्या ग्रामस्थांवरील वाढत्या हल्ल्यामुळे नागरीकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हेळवाक वनपरिक्षेत्रातील अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या कोळणे येथील अर्जुन डांगरे हे मोबाईलला रेंज येत नसल्या कारणाने मोबाईलला नेटवर्क असलेल्या ठिकाणी फोन करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला चढवत त्यांना गंभीररित्या जखमी केले. या हल्ल्यात डांगरे यांच्यावर हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर अस्वलाने तेथून धूम ठोकली.
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु, प्रकृती नाजूक
या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर ग्रामस्थ व वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अर्जुन डांगरे यांना तात्काळ उपचारासाठी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्यात अर्जुन डांगरे यांच्या हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजत आहे.
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील लेंडीजोबच्या जंगलात झाडावर अस्वलाचे दर्शन
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील लेंढीजोबच्या जंगलात गावातील काही नागरिकांना झाडावर अस्वलीचे दर्शन झाले. सध्या मोहपूल वेचण्याच्या हंगाम सुरू असून लेंढीजोब गावातील नागरिक मोहफुल वेचण्याकरिता जंगलात जात असताना अस्वल झाडावर चढल्याचे दिसले. परिसरातील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना याची माहिती मिळताच जंगल परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
