एक्स्प्लोर
Budget 2025 : 12 लाखांच्या निर्णयामुळं 85 टक्के करदाते करमुक्त, सरकार 1 लाख कोटींवर पाणी सोडणार
Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत देण्याची घोषणा केली.

बजेट 2025
1/5

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करसवलतीत आणलं.
2/5

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 85 टक्के प्राप्तिकरदात्यांना होणार आहे. पगारदारांना 75 हजारांचा स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ होतो त्यामुळं पगारदारांचं 12.75 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. म्हणजे त्यांना एकही रुपया कर द्यावा लागणार नाही.
3/5

2021-22 मध्ये 6.33 करदात्यांनी वैयक्तिक प्राप्तिकर भरला होता. त्यातील 5.51 कोटी करदात्यांचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी होतं.
4/5

केंद्राच्या नव्या निर्णयानुसार 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत दिल्यानं सरकारला 1 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे. सरकारमधील एका अधिकाऱ्यानं सीएनएन-न्यूज 18 सोबत बोलताना ही माहिती दिली होती.
5/5

2024-25 च्या आकडेवारीनुसार सध्या नव्या कररचनेत 7.28 कर दाते आहेत. तर, 2.01 कोटी करदाते जुन्या कररचनेत आहेत. येत्या काळात नव्या कररचनेत येणाऱ्यांची संख्या वाढू शकते.
Published at : 02 Feb 2025 03:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion