एक्स्प्लोर

BLOG : 'दादा' लेग स्पिनर!

Shane Warne Passes Away: शेन वॉर्न. या दोन शब्दांमध्ये लेग स्पिनचं विश्व सामावलंय. म्हणजे लेग स्पिन तशी दुर्मिळ कला समजली जाते. त्या दुर्मिळ कलेची मैफल रंगवणारा आणि जिंकणारा अवलिया कलाकार म्हणजे शेन वॉर्न. माझ्या पिढीने चंद्रशेखर, सुभाष गुप्ते आदी महान गोलंदाजांची किमया पाहिली नाही. अब्दुल कादीर यांच्या कारकीर्दीची सांगता होताना पाहिली. भारताकडून शिवरामकृष्णन, हिरवाणींच्या कामगिरीचे आम्ही काही प्रमाणात साक्षीदार झालो. पण, जे तीन गोलंदाजीचं विश्व व्यापून राहिले ते वॉर्न, मुरलीधरन आणि कुंबळे. त्यातला शेन वॉर्न ऑसी क्रिकेटर. या तिन्ही गोलंदाजांची करिअर आमच्या पिढीने जवळून पाहिली. वैयक्तिक आयुष्यातील अनेक वादळांनी त्याच्या नौकेने हेलकावे खाल्ले. पण, प्रोफेशनल क्रिकेटमधील त्याचा परफॉर्मन्स मात्र हलला नाही.

145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स तर 194 वनडेत 293 विकेट्स. म्हणजे आंतरराष्ट्रीय मैदानात 1000 विकेट्सचा टप्पा पार. ही कामगिरी त्याच्या महानतेची साक्ष द्यायला पुरेशी  बोलकी आहे. मला वॉर्नचा ग्रेटनेस आणखी जास्त अशासाठी वाटतो की, तो ऑस्ट्रेलियाच्या अशा प्लेईंग इलेव्हनमध्ये कारकीर्दीतील बहुतांश सामने खेळला, जिथे मॅग्रा, ली आणि गिलिस्पीसारखा वेगवान तोफखाना होता. जे प्रतिस्पर्धी फलंदाजीच्या भिंतीला सुरुवातीलाच सुरुंग लावत. त्या गोलंदाजांमध्ये स्थान मिळवून वॉर्नने 708 विकेट्स घेतल्यात आणि आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. वेगवान आक्रमणाची धार असलेल्या ऑसी भूमीत वॉर्नसारखं फिरकी अस्त्र जन्माला आलं आणि त्याने समोरच्या संघाची फलंदाजी (अपवाद फक्त भारताचा) अनेकदा अक्षरश: कापून काढली. त्याचा लेग ब्रेक नव्वद अंशात वळत असे. जगातील कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही प्रतिस्पर्धी संघासमोर, कसोटी सामन्याच्या कोणत्याही दिवशी, कोणत्याही सत्रात चेंडू हातभर वळवण्याची हुकमी करामत वॉर्नच करु जाणे. त्याची कारकीर्द 1992 ते 2007 मध्ये जवळपास 15 वर्षांची. योगायोग पाहा 2 जानेवारी 1992 ला कसोटी पदार्पण आणि 2 जानेवारी 2007 ला अखेरची कसोटी. दोन्ही मॅचेस सिडनीमध्येच.

कारकीर्दीच्या उत्तरार्धात वॉर्नने 2001 ते 2006 या कालावधीत त्याने प्रतिवर्षी अनुक्रमे ५८, ६७, ७०, ९६ आणि ४९ अशा विकेट्स घेतल्यात. त्याने घेतलेल्या कसोटी विकेट्सपैकी ११५ क्लीन बोल्ड आहेत, १३९ पायचीत आहेत, ७३ यष्टीपाठी कॅच आऊट आणि ३६ स्टम्पिंग आहेत. म्हणजे इतरांनी घेतलेल्या कॅचेसमुळे त्याला मिळालेल्या विकेट्सची संख्या ३४५ च्या घरात आहे. त्याने मायभूमीत घेतलेल्या विकेट्सची संख्या ३१९ तर परदेशातली ३८९ आहे.

तो उपयुक्त फलंदाजही होता. ज्याने कसोटीत १२ अर्धशतकी खेळी केल्या होत्या. सर्वोत्तम स्कोर ९९. वनडेचं मैदानही त्याने गाजवलं, पण, तो कसोटी क्रिकेटचा दादा बॉलर होता. ओव्हर द विकेट आणि अराऊंड द विकेट गोलंदाजी तो तितक्याच सहजतेने करत असे. माईक गॅटिंगची त्याने घेतलेली विकेट ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ म्हणून ओळखली जाते. तर, बासित अलीची त्याने अराऊंड द विकेट गोलंदाजी करत घेतलेली विकेटही चांगलीच गाजली. खरं तर त्याने घेतलेल्या अशा अनेक विकेट्सचे व्हिडीओ आजही लाखोंनी हिट्स घेतात.

भारतीय फलंदाज मात्र त्याला सफाईदारपणे खेळत. सिद्धू, विनोद कांबळी, सचिनसह सर्वच आघाडीच्या फलंदाजांनी शेन वॉर्नचा समर्थपणे सामना केला. इतकंच काय शारजातील १९९८ च्या स्पर्धेतील सचिनची फलंदाजी पाहून शेन वॉर्ननेही त्याचं दिलखुलास कौतुक केलं. सचिन स्वप्नातही मला षटकार ठोकत असल्याचा भास होतो, असं वॉर्न म्हणाला होता.

केवळ कसोटी क्रिकेट अन् वनडेच नव्हे तर आयपीएलच्या पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून देणारा सेनानी होता तो शेन वॉर्नच.

आता ही त्याची गाजलेली वाक्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाची झलक देणारी, तीही जरा बघूया.

I have always tried to move on from disappointments as fast as I can.

You can’t afford your life to live with regrets.

Part of the art bowling spin is to make the batsman think something special is happening when it isn’t.

With just about every player in Australia, his whole goal and ambition is to play for Australia. That’s why they are playing first class cricket. It’s just a different attitude.

ऑस्ट्रेलियाचा never say  die attitude आणि killer instinct त्याच्या गोलंदाजीत पुरेपुर असे. सहसा आक्रमक फलंदाज किंवा वेगवान गोलंदाजाला वादळाची उपमा दिली जाते. मात्र इथे शेन वॉर्नला मला ती द्यावीशी वाटतेय. एरवी फलंदाजांना पाहायला, त्यांचे चौकार-षटकार अनुभवायला क्रिकेटरसिक मैदानात येतात, असं म्हटलं जातं. इथे शेन वॉर्नची गोलंदाजी पाहायला कसोटी सामन्यांना आवर्जून हजेरी लावणारे प्रेक्षक आपल्याला असंख्य पाहायला मिळतील. अशा या लिजंडरी स्पिनरने अवघ्या 52 व्या वर्षी एक्झिट घेतलीय. त्याची जादुई फिरकी आपल्याला पुढची असंख्य वर्ष त्याच्या आठवणींमध्ये मुक्तपणे नाचवत ठेवणार हे निश्चित. चॅम्पियन स्पिनरच्या परफॉर्मन्सला हॅट्स ऑफ.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली,  बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav : बिनविरोध निवडणूक बाबतची अविनाश जाधव यांची याचिका कोर्टाने फेटाळली
Sharad Pawar Ajit Pawar NCP : एकत्र येणार? नाही..नाही..नाही, अजित पवारांचं उत्तर ऐकलं का? Special Report
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Naresh Arora Action : कारवाईचा अलार्म, सल्लागाराला घाम! अजित पवारांचे सल्लागार क्राईम ब्रँचच्या रडारवर Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली,  बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today:  मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget