एक्स्प्लोर

BLOG : शिक्षिका ते गुगलची प्रोग्रॅम मॅनेजर असा प्रवास करणारी मार्टा

BLOG : मार्टा आणि माझी भेट नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन परिषदेत झाली. आम्ही दोघेही वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी तिथे आलो होतो. तंत्रज्ञान विषयक चर्चासत्रात तिचे विचार ऐकून मी प्रभावित झालो होतो. एकमेकांशी लिंक्डइनवर कनेक्ट होण्यापुरता आमचा संवाद झाला. पण नंतर आम्ही फारसे संपर्कात राहिलो नाही. मागील वर्षी, सप्टेंबर 2024 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण विषयक चर्चासत्रात मार्टा तिचे विचार मांडण्यासाठी आली तेव्हा आम्ही पुन्हा एकदा भेटलो. यावेळी मात्र  मला तिच्याबद्दल वेगळीच माहिती मिळाली. मार्टा आधी शिक्षिका होती आणि आता ती गुगलमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून काम करते. तिच्या या प्रवासाबद्दल मला अधिकच उत्सुकता निर्माण झाली. आणि याच उत्सुकतेतून मी तिच्याशी केलेल्या संवादाचा हा स्वैर अनुवाद. 

पोर्तुगालच्या सरकारने मुलींसाठी सुरू केलेल्या शिष्यवृत्तीतून तिच्या आईने 4 थी नंतरचे  शिक्षण घेतले. वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या आईने शिक्षण घेण्यासाठी घर सोडले आणि ती लिस्बन येथे पोहचली. तिथेच तिची ओळख मार्टाच्या वडिलांशी झाली. शालेय शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी  तिची आई अमेरिकेत पोहचली. तिथे तिची ओळख मार्टाच्या वडिलांशी झाली. या स्थलांतरित कुटुंबात मार्टाने जन्म घेतला. 

लहानपणी ब्रॉडवेवरती  स्वतःच्या गाण्याचा कार्यक्रम व्हावा असे तिचे स्वप्न होते. मात्र आठवीमध्ये इतिहास शिकवणाऱ्या  शिक्षिका रायन यांच्यामुळे प्रभावित होवून तिने शिक्षक होण्याचे ठरवले. रायन मॅडमनी तिला नववी ते 12 वी पर्यंत शिकवले. त्यांच्या शिकवण्याचा आपल्यावर प्रभाव आहे असे तिला वाटते. मुलांशी संवाद साधण्याचे कौशल्य आपल्यात आहे असे तिला कायमच वाटत होते आणि त्यामुळेच तिने शिक्षिका होण्याचे ठरवले. कुटुंबात झालेले संस्कार, शिक्षणातून होणारी मूल्य रुजवण यामुळे आपण शिक्षकी पेशाकडे वळलो असे ती अभिमानाने सांगते.

कॉलेजमध्ये असताना तिने अनेकविध शाळा, संस्थांमध्ये नोकरीकरिता अर्ज केले होते. गुगलमध्येही नोकरीकरिता तिने अर्ज केला होता. पण शेवटी तिला टीच फॉर अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील शाळेत सन 2009 मध्ये शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. तिची ही शाळा,  अनेकविध संकटात सापडलेल्या, वर्तणुकीबद्दल समस्या असणाऱ्या आणि शाळेतून बाहेर काढलेल्या मुलांना शिक्षण देण्याचे काम करायची. 10  ते 16 वर्षे अशा भिन्न वयोगटातील मुलांना  शिकवण्याचे काम ती करत होती. या शाळेतील 83 टक्के मुले विशेष गरजा असणाऱ्या गटात मोडत होती. 

मार्टाने या शाळेत शिकवायला सुरुवात केलावर त्याच वर्षी  तिच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थाना टायटल वन या सरकारी योजनतेतून लैपटॉप मिळाले. याच अनुदानातून तिच्या शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.   शाळेत उपलब्ध असणाऱ्या लैपटॉपच्या मदतीने तिने मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि बघता बघता तिच्या वर्गातील पटसंख्या 9 वरून 30 पर्यंत जावून पोहचली. मार्टाने या शाळेत शिकवायला सुरुवात केल्यावर तिला गुगलने मुलाखतीसाठी बोलावले. शाळेतील मुलाना शिकवण्यात आनंद मिळत आहे असे सांगून तिने गुगलला नकार कळवला. नोकरीच्या पहिल्याच वर्षी तिच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी  गणित परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. तिच्या वर्गाचा शंभर टक्के निकाल लागला. मार्टा स्वतःच्या कामगिरीवर फारच खूश होती. 

याच शाळेत सुरू करण्यात आलेल्या ‘स्कूल ऑफ वन’ या तंत्रज्ञान विषयक उपक्रमातील सहभागामुळे तिला गुगलमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि काय आश्चर्य, मुलाखतीनंतर तिला गुगलने नोकरी दिलीही.  शाळेत काम करत असताना तिला एक बाब जाणवली की तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या शिक्षणविषयक प्रोडक्ट बनवताना शिक्षकांचा फीडबॅक फारसा विचारात घेत नाहीत. तिला ही बाब कायमच खटकत होती. त्यामुळेच आज जेंव्हा गुगलच्या एज्युकेशन टीम मध्ये नोकरी देताना आम्ही शिक्षक म्हणून केलेल्या कामाला महत्व देतो असे ती म्हणते. 

शिक्षक आणि गुगलची प्रोग्रॅम मॅनेजर यापैकी कोणता जॉब कठीण वाटतो असे विचारले असता, शिक्षकाचा जॉब फारच कठीण आहे असे ती म्हणते. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना शिकवणे हे फारच कठीण आहे असे तिला वाटते. अर्थात गुगलमध्ये काम करीत असली तरी तिने शिक्षणविषयक काम थांबवले नाहीये. शिक्षकांना तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देणे, मुलांमध्ये तंत्रज्ञाविषयक आवड निर्माण करण्यासाठी गुगलमधील कामातून वेळ काढून काम करते. अर्थात गुगलमधील तिचा प्रवासही तितकाच रंजक आहे. 

सुरुवातीला  तिला असे वाटले की गुगलमध्ये शिक्षणविषयक काम करणारी टीम असेल. तिच्या मुलाखती मध्येही तिने हेच सांगितले की शिक्षणविषयक टीम मध्ये काम करायला तिला रस आहे. गुगल ऍप फॉर एज्युकेशन नावाची एक टीम होती मात्र त्यात कोणी शिक्षक नव्हता. शेवटी गुगलने तिला त्यांच्या जाहिरात विभागाच्या च्या सेल्स टीममध्ये संधी दिली. पण कायमच नवनवीन काम करण्याची आवड असणाऱ्या मार्टाने तिथेही आपल्या कामाची चुणूक दाखवायला सुरवात केली. 

गुगलमध्ये प्रोजेक्ट वीस टक्के (Project 20%) नावाची एक योजना राबवली जाते. ज्याअंतर्गत गूगलमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्या आवडीच्या विभागात त्यांच्या कामाच्या एकूण वीस टक्के वेळ व्यतित करू शकतात. याच योजनेचा फायदा घेवून मार्टाने गुगलमधील इंजिनियरिंग टीमसोबत काम करून, अँड्रॉईड अँड गुगल प्ले फॉर एज्युकेशन वन नावाचा एक प्रोजेक्ट सुरू  केला. ती आणि तिचे सहकारी यांनी केंब्रिजमधील शाळांमध्ये जावून त्यांच्या प्रॉडक्टची चाचणी देखील घेतली. आणि मग 2012 मध्ये गुगलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर सादरीकरण करून अँड्रॉइड वन या प्रोजेक्टकरिता संमती मिळवली. 

सेल्स टीममधून टेक टीममध्ये जाताना तिला तब्बल 9 वेळा मुलाखत द्यावी लागली. या 9 मुलाखती म्हणजे सर्वात कठीण आणि संयमाची परीक्षा पाहणारा काळ होता. यामागचे कारण विचारले असता ती म्हणते की एकतर मला कसलेही तंत्रज्ञान विषयक अनुभव, ज्ञान किंवा पदवी नव्हती. त्यामुळे आमच्या टीमला फारसा विश्वास नव्हता. सरतेशेवटी 9 कठीण टप्पे पार पडल्यावर तिचा हा अँड्रॉइड वन हा प्रोजेक्ट सुरू झाला. या प्रोजेक्ट करिता 5 टीम मेंबर देखील गुगलने तिच्या दिमतील दिले. वाढत्या कामामुळे तिची ही टीम पुढे 30 सदस्यांची झाली. पण दोनच वर्षात गुगलने क्रोम फॉर एज्युकेशन बाजारात आणले आणि तिच्या या अँड्रॉइड वन प्रोजेक्टला गाशा गुंडाळावा लागला. हे तिच्या आयुष्यातील सर्वात  मोठे अपयश आहे असे तिला वाटते. प्रोजेक्ट बंद झाल्यामुळे मार्टाच्या नोकरीवर देखील गंडांतर आले. पण थोड्याच दिवसात तिने क्रोम फॉर एज्युकेशनची टीम जॉइन केली. 

या अपयशातून काय शिकलीस असे तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, स्वतःवरती असणारा आत्मविश्वास, स्वतःच्या क्षमतांबद्दल असणारी जाणीव आणि कठीण परिश्रम करण्याची तयारी यांमुळे मी अशा अपयशातून बाहेर पडले. कोको चॅनेलच्या ‘The most courageous act is still to think for yourself. Aloud’ या वाक्यांनी तीला आजवर प्रेरणा दिली आहे. 

सध्या जनरेटिव्ह AI च्या जमान्यात माणसाची तार्किक विचार करण्याची क्षमता कमी होवू नये म्हणून लर्निंग सायन्स इन एज्युकेशन या संदर्भातील प्रकल्पावर ती सध्या काम करते आहे. शिक्षक हे सर्वोत्तम AI प्रॉम्प्टर आहेत असे तिचे निरीक्षण आहे. कारण शाळेतील मुलाना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत संवाद साधून त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेण्याचे त्यांचे कौशल्य AI च्या दुनियेत फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी AI चा वापर करण्याला प्राधान्य द्यावे असे तिला वाटते. तंत्रज्ञानाचा दुनियेत सुरू असणारा हा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
Malaika Arora Ready For Second Marraige: अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अरोरा दुसरं लग्न करणार? म्हणाली, 'यासाठी मी पूर्णपणे तयार...'
Chhatrapati Sambhaji Nagar Rashid Mamu: चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच, अंबादास दानवेंची सरशी
Neha Bhasin Decides Never Wants To Have Kids: 43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पती जबाबदार असल्याचंही थेट सांगून टाकलं
43 वर्षांच्या गायिकेचा मूल न होऊ देण्याचा निर्णय, लग्नाच्या नऊ वर्षांनीही ठाम; पतीलाच धरलं जबाबदार
Embed widget