Swabhimani Shetkari Sanghatana ची कुठल्याही पक्षाशी युती नाही : Prashant Dikkar
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कुठल्याही पक्षाची युती आघाडी सध्या तरी नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीचा राज्यातील जाहीर झालेल्या पहिला उमेदवार "एबीपी माझा " वर.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी जरी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना भेटले असतील तरी मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कुठल्याही पक्षाशी किंवा आघाडीची सध्यातरी बोलणी सुरू नसल्याचं स्वाभिमानीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी म्हटलं आहे. प्रशांत डीक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यातील जाहीर झालेले पहिले विधानसभेसाठी चे उमेदवार आहेत. राजू शेट्टी यांनी प्रशांत डीक्कर यांना स्वाभिमानीचा गड असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे . आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ही जाहीर झालेली पहिली उमेदवारी आहे. येत्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकतेने लढेल व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल असे प्रशांत डीक्कर यांनी म्हटलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांनी.