Pyare Khan: नितेश राणेंच्या वक्तव्यावर अल्पसंख्यांक आयोग गंभीर, प्यारे खान संतापले; थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार
नितेश राणेंच्या या बेजबाबदार वक्तव्यांची अल्पसंख्यांक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य करून सरकारची प्रतिमा मलिन करू नका असे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले.

Pyare Khan: राज्याचे मंत्री नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून मुस्लीम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बुरख्याबद्दल वक्तव्य केले आहे.त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांनी मुस्लीम समजाबद्दल दृष्टीकोन बदलावे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी हे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्त्वावर काम करत आहेत. अशावेळी मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून सरकारची प्रतिमा मलिन करून नये, असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून हलाल मटण आणि मल्हार मटण सर्टिफिकेटवरून मोठा वादंग सुरु आहे. त्यांनंतर औरंगजेब प्रकरणावरून राज्यमंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. या बेजबाबदार वक्तव्यांची अल्पसंख्यांक आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
नितेश राणेंची पंतप्रधानांकडे तक्रार करणार: प्यारे खान
दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवरून पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री प्यारे खान यांनी सांगितले. महाराष्ट्रातून विशेषत: नागपूरमधून नितेश राणेंच्या मुस्लीम समाजावरून केलेल्य वक्तव्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचं प्यारे खान यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आली होती. भारतात सबका विकासचा नारे दिले जातात पण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या वक्तव्य आल्याने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. अल्पसंख्यांक मंत्री या नात्याने नितेश राणेंच्या वक्तव्यांची तक्रार पंतप्रधानांकडे करणाार असल्याचंही ते म्हणालेत.
अमरावतीत नितेश राणेंवर गुन्हा दाखल
भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात अमरावतीच्या (Amravati News) अचलपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी काल(रविवारी) हिंदू जण आक्रोश सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात धार्मिक भावना दुखवणे, कलम 196 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. इमरान खान असलंम खान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार देत आमदार नितेश राणे आणि सागर भैय्या बेग, कोपरगाव या दोघांवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

























