एक्स्प्लोर

हिंदुत्व आमच्या DNA मध्येच, उद्धव ठाकरेंकडे औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व, बावनकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले, पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही 

हिंदुत्व आमच्या डीएनएमध्येच आहे, पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्वाचा त्याग केला आहे असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली.

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : हिंदुत्व आमच्या डीएनएमध्येच आहे, पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्वाचा त्याग केला आहे. आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले आहेत. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले आहे. आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही असे बावनकुळे म्हणाले. 

मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही

भाजपचा “सौगात-ए-मोदी” हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या सरकारने देशाला 24 तास वीज, पाणी, रस्ते, घरं आणि रोजगार दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही असेही बावनकुळे म्हणाले. गुन्हेगार, बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना सरंक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित बंदोबस्त करीत आहेत. पण आता हेच लोकं उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत? याची उत्तरं आधी त्यांनी जनतेला द्यावीत असेही बावनकुळे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनी जनतेला काय दिलं? बावनकुळेंचा सवाल 

हिंदुत्व भाजपचा डीएनए असल्याचे बावनकुळे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंकडे मात्र औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व असल्याची टीका त्यांनी केली. समाजविघातकांचा देवेंद्र फडणवीस बंदोबस्त करताहेत पण हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय? झाले असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे. “सौगात-ए-मोदी” नाही, तर ही विकासाची गॅरंटी मोदी आहेत. उद्धव ठाकरेंनी जनतेला काय दिलं? असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केला आहे. 

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. ईदच्या निमित्ताने भाजपने सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी 32 हजार भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन  सौगात ए मोदी देणार आहेत. हे काय सौगात ए मोदी नाही तर हे सौगात ए सत्ता असल्याचे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याचं एक हे निर्लज्य उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. ही सोगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपूरती राहणार आहे की नंतर सुद्धा राहणार आहे, भाजपनं जाहीर करावं असे ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

वर्षभर मुस्लिमांच्या नावाने शिमगा अन् निवडणुका आल्या की पुरणपोळी, 'सौगात ए मोदी' वरुन ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget